Monday, April 24, 2017

मागेल त्याला शेततळे - महाराष्ट्र शासन

महाराष्ट्र शासनाची “मागेल त्याला शेततळे” या महत्वाकांक्षी योजने अंतर्गत शेतकरी बांधवांना शेततळे बांधण्यासाठी अनुदान दिले जाते. या योजनेअंतर्गत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. हा अर्ज कसा भरावा किंवा अर्ज भरण्यासाठी काय करावे हे जाणून घेणे गरजेचे आहे. या योजनेअंतर्गत वैयक्तिक आणि सामुहिक पद्धतीने अर्ज दाखल करता येऊ शकतो.


या योजनेचा लाभ घेण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईट ला भेट द्या.
  • या लिंक वर गेल्यावर तुम्हाला “अर्ज भरण्यासाठी इथे क्लिक करा” असे लिहिलेल्या ठिकाणी क्लिक करा.
  • आपले सरकार प्रोफाईल वरून लॉगीन करा.
  • वयक्तिक किंवा सामुहिक शेततळे हा पर्याय निवडा त्यानंतर अर्ज दाखल करून अॅप्लिकेशन नंबर लिहून ठेवा.
लाभार्थी पात्रता :
  • शेतकऱ्याकडे त्याच्या नावावर कमीत कमी दीड एकर जमीन असावी. यात कमाल जमीन धारणेची मर्यादा नाही.
  • लाभार्थी शेतकऱ्याची जमीन तांत्रिक दृष्ट्या पात्र असणे आवश्यक राहील. जेणेकरून पावसाचे पाणी शेततळ्यामध्ये भरणे किंवा पुनर्भरण करणे शक्य होईल.
  • अर्जदाराने यापूर्वी शेततळे, सामुदायिक शेततळे किंवा भातखाचरा सोबत तयार होणारी बोडी या घटकांचा शासकीय योजनेतून लाभ घेतलेला नसावा.
अर्जदाराला खालील कागदपत्रे सदर करणे आवश्यक आहे.
  • जातीचा दाखला
  • ७/१२ चा उतारा
  • ८ -अ नमुना (संबंधित शेतक-याचे ८ अ प्रमाणे एकूण क्षेत्र)
  • आत्महत्याग्रस्त्त कुटुंबाच्या वारसाचा दाखला. (तलाठी)
  • दारिद्र्य रेषेबाबतचा दाखला (ग्राम सेवक)
  • स्वतःच्या स्वाक्षरीसह भरलेला अर्ज
  • आधार कार्ड (उपलब्ध असल्यास)
शेततळ्यासाठी अटी / नियम :
  • कृषि विभागाचे कृषी सहाय्यक / कृषि सेवक यांनी निश्चित केलेल्या ठिकाणी शेततळे घेणे बंधनकारक असेल.
  • कार्यारंभ आदेश मिळाल्या पासून शेततळ्याचे काम तीन महिन्यात पूर्ण करणे बंधनकारक राहील .
  • लाभार्थींना स्वतःचे राष्ट्रीयकृत बँक / इतर बँकेतील खाते क्रमांक संबंधित कृषी सहाय्यक /कृषी सेवक यांकडे पासबुकच्या झेरॉक्स सह सदर करावा .
  • कामासाठी कोणतीही आगाऊ रक्कम मिळणार नाही .
  • शेततळ्याच्या बांधावर व पाण्याच्या प्रवाहाच्या भागामध्ये स्थानिक प्रजातीच्या वनस्पतींची लागवड करावी .
  • शेततळ्याची निगा व दुरुस्तीची जबाबदारी संबंधित शेतकर्याची राहील
  • पावसाळ्यात तळ्यात गाळ वाहून येणार नाही अथवा साचणार नाही यासाठी व्यवस्था लाभार्थ्याने स्वत करावी .
  • लाभार्थ्याच्या ७/१२ उताऱ्यावर शेततळ्याची नोंद घेणे बंधनकारक आहे .
  • मंजूर आकारमानाचे शेततळे खोदणे हे बंधनकारक राहील.
  • शेततळ्याला इनलेट आउटलेट ची सोय असावी .
  • शेततळ्यासाठी प्लास्टिक अस्तरिकरण अर्जदाराला स्वखर्चाने करावे लागेल.