Tuesday, June 6, 2017

माझीशेतीची शेतकऱ्यांच्या सोबत जवळीकता वाढणार... माझीशेतीच्या (mazisheti.org) वेबसाईटवर शेतकऱ्यांना करता येणार दोन्ही बाजूने संभाषण.

माझीशेतीची शेतकऱ्यांच्या सोबत जवळीकता वाढणार... माझीशेतीच्या (mazisheti.org) वेबसाईटवर शेतकऱ्यांना करता येणार दोन्ही बाजूने संभाषण.

माझीशेतीच्या शेतकरी विकासाकरिता असलेल्या धोरणांमध्ये एक एक पाऊल पुढे टाकले जात आहे. आज माझीशेती ग्रुपचे प्रमुख महेश बोरगे यांनी आयटी टीममधील अश्विनी शिंदे व इतर सहकाऱ्यांचे आभार मानत ऑनलाइन चॅटची (सर्फिंग करत असताना ऑनलाइन संभाषण सहाय्य) सुविधा शेतकऱ्यांना समर्पित केली. या सुविधेमुळे शेतकऱ्यांना वेबसाईटवर माहिती घेताना काही अडचण आल्यास सरळ सहाय्यता उपलब्ध करून दिली जाणार आहे. 

शेतकऱ्यांना शेती व शेतीला पूरक व्यवसाय मार्गदर्शनासह शासकीय योजना, अर्थसहाय्य, बाजारपेठ, मनुष्यबळ व इतर संबंधित आवश्यक गोष्टींची उपलब्धता होईल. महाराष्ट्र व इतर मराठा भाषिक शेतकऱ्यांना उपयोगी या सेवांना अधिक गती देण्याची व्यवस्था खंबीरपणे पेलण्यासाठी आयटीची टीम संख्या कमी असली तरी सक्षम आहे असे अश्विनी शिंदे यांनी सांगितले.

यापुर्वीच शेतकऱ्यांच्या स्थानिक ग्रुपच्या साहाय्याने प्रत्यक्षात शेतीमध्ये मार्गदर्शन करताना शेतकऱ्यांची उत्पादन पद्धती आणि छोटे उद्योगांची शृंखला तयार करून ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी मैलाचा टप्पा पार केला आहे. 

नांदेड जिल्ह्यातील शिवशंकर ढोबळे, वर्धा जिल्ह्यातील शुभम शेंडे, सांगली मधून प्रशांत शिंत्रे, धनंजय उरणे यांच्यासह इतर सर्व स्वयंसेवक यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक ग्रुप सक्रिय आहेत. ग्रामीण शाश्वत विकास (RSD) व संस्था संसाधन केंद्र (ORC) या दोन प्रकल्पाच्या माध्यमातून प्रत्यक्ष क्षेत्रावर काम आणि ग्रीट, FBL, मिलनरिंग या प्रकल्पाच्या माध्यमातुन अप्रत्यक्ष शेतकरी, कष्टकरी, भुमीहीन गटांच्या विकासासाठी माझीशेतीची व्यवस्था कार्यरत आहे. 

माझीशेतीच्या कार्यवाहणाकरिता निधी अपुरा पडत असून आपल्यापैकी काही मोठे शेतकरी, उद्योजक, देणगीदार यांनी आपापल्या परीने निधी माझीशेतीकडे जवळच्या स्वयंसेवक मार्फत आमच्याकडे जमा करावी, (आम्ही रोख रक्कम स्वीकारत नाही) असे आवाहन सर्व माझीशेती ग्रुपने केले. 

#mahesh_borge #mazisheti #orc #rsd