Monday, February 12, 2018

व्यावसायिक शेतकरी महिला सक्षमीकरण = रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त महिला आयोग आणि माझीशेती शेतकरी प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यशाळा

महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त
महिला आयोग आणि माझीशेती शेतकरी प्रतिष्ठान
यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यशाळा
महाराष्ट्र राज्य महिला आयोग आणि माझीशेती शेतकरी प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने तासगाव जि.सांगली येथे व्यावसायिक शेतकरी महिला सक्षमीकरण कार्यशाळा आयोजित करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. एस. बी. पाटील यांनी केले. त्यांनी महिला आयोगाची स्थापना आणि आतापर्यंतची वाटचाल यावर प्रकाशझोत टाकला. 


संस्थेचे अध्यक्ष महेश बोरगे, उपजिविका तज्ञ यांनी ग्रामीण भागाच्या विकासामध्ये शेतकरी विकास प्राधान्याने करणे आणि त्यासाठी विद्यार्थी, उद्योजक, इतर सामाजिक संस्था आणि शासकीय यंत्रणा यांनी एकत्रित काम करणे आवश्यक आहे असे सांगितले. त्यांनी व्यावसायिक स्तरावर शेती व्यवस्थापन करण्यावर शेतकऱ्यांनी भर द्यावा असे सांगितले. शेती व्यवस्थेमध्ये माहिती तंत्रज्ञानाचा उपयोग करताना हवामान अंदाज, बाजारभाव, पिकसल्ला, शासकीय योजना यांची माहिती घेणे कसे महत्वाचे आहे यावर माहिती दिली. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रत्यक्ष जीवनात होणारा उपयोग आणि ग्रामीण जीवनाकडे ओढा वाढविण्यासाठी संस्थेची ‘विद्यार्थी विकास योजना’ आणि त्यामध्ये विद्यार्थ्यांना मिळणारे रु. १०००/- प्रतिमाह मानधन याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. ग्रामीण अर्थव्यवस्थेसाठी शेती आणि शेती पुरक व्यवसायांची शृंखला तयार करणे गरजेचे आहे आणि त्यासाठी शासन सदैव तत्पर आहे.

कार्यशाळेमध्ये व्यावसायिक शेती व्यवस्थापन व
 माहिती तंत्रज्ञानाचा ग्रामीण विकासामध्ये उपयोग 
याविषयावर बोलताना श्री. महेश बोरगे, उपजिविका तज्ञ
शासनाने ई- गव्हर्नन्स मध्ये घेतलेला पुढाकार हा जितका चांगला तितकाच वाईट आहे हे सांगताना त्यांनी .com, .org, .in, .edu अश्या संगणकीय भाषेतील डोमेन आणि वेबसाईट यामधील फरक समजावून सांगितला. सोशल मिडिया आणि संकेतस्थळे यांचा व्यवसाय वृद्धीसाठी वापर करणेसाठी संस्थेची बहुआयामी डिजिटल व्यासपीठ उपयोग करण्याबाबत प्रोत्साहन दिले. या योजनेचा विद्यार्थी, व्यावसायिक आणि शेतकऱ्यांना होणारा उपयोग आणि रोजगार निर्मिती याकडे लक्ष वेधले. सहभागी मुलांना शंका विचारून त्यांनी भाषणाची सांगता केली.

मा. श्री. प्रमोद गुरव, महिला व बाल विकास तज्ञ यांनी अनैतिक व्यापार प्रतिबंध कायदा - १९५६, कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ अधि. - २०१३, भारतीय दंडसंहिता कलमे - ३७६, ४७९, ४९३, ४९४, ४९५, ४९६, ४९८ (अ), ३५४, ३७६, ५०४, ५०६, ५०९ आणि सायबर क्राईम अधि. - २०१५, कौटुंबिक हिंसाचार - २००५, तिहेरी तलाक, हिंदु वारसा हक्क, प्रसूतीपूर्व लिंग निदान प्रतिबंधक कायदा - १९९४, बाल-लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायदा (POCSO) - २०१२ या कायद्यांचे सविस्तर मार्गदर्शन केले. 

कार्यशाळेमध्ये महिलांसाठी शासनाचे धोरण,
योजना आणि संरक्षण व कायदे याविषयावर बोलताना
श्री. प्रमोद गुरव, महिला व बाल विकास तज्ञ 
त्यांना समुपदेशन केंद्रातील अनुभवाच्या सहाय्याने त्यांनी उपस्थितांना भावनांच्या परमोच्च शिखरावर नेले. कार्यक्रमादरम्यान दुखःद अनुभव सांगताना उपस्थितांचे डोळे पाणावून गेले तसेच मनोरुग्णांचे अनुभव सांगताना सभागृहात हास्यफवारे उडाले. मुलींनी आणि मुलांनी सामाजिक ठिकाणी घ्यावयाची काळजी यावरील प्रबोधन मोलाचे ठरेल.

कार्यकमाची सांगता श्रद्धा पाटील यांनी स्वतः शंका आणि प्रश्नांच्या माध्यमातुन सर्व सहभागी विद्यार्थी, शिक्षक आणि कर्मचाऱ्यांच्या वतीने आभार प्रदर्शित केले. एकंदरीत संपुर्ण कार्यक्रम नियोजित कार्यक्रम पत्रिकेप्रमाणे  पार पडला.

कार्यक्रम सहभाग अंमलबजावणी पथक
लेखक         –        रिया चौधरी, मुख्य प्रकल्प समन्वयक [पुणे विभाग]
वक्ते             –        श्री. महेश बोरगे, उपजिविका तज्ञ [अध्यक्ष माझीशेती शेतकरी प्रतिष्ठाण]
वक्ते             –        श्री. प्रमोद गुरव, महिला व बालविकास तज्ञ [व्याख्याते]
समन्वय        –        श्री. रावसाहेब देशमुख, 
फोटोग्राफी   –        श्री. धनंजय उरणे 
सहाय्यक      –        श्री. स्वप्नील गेंड, श्री. सोमनाथ पाटील 
डिजिटल       –        माऊली डिजिटल
स्टेशनरी       –        एस. एफ. नेट कॅफे
आयटी          –        अश्विनी शिंदे
प्रवास           –        मंगलमुर्ती मोटर्स
केटरिंग       –        संगीता मंडप डेकोरेशन
दृकश्राव्य      –        संगीता मंडप डेकोरेशन

No comments:

Post a Comment