Showing posts with label शेतकरी. Show all posts
Showing posts with label शेतकरी. Show all posts

Saturday, June 17, 2017

शेतकरी संप व आंदोलनाचा परिणाम म्हणून मिळालेली कर्जमाफी म्हणजे शेतकऱ्यांची फसवणुक... ?

*किसान क्रांती वृत्त*
१६/०६/२०१७, सायं.५.००
👉दहा हजारच्या तातडीच्या खरीप पिककर्जाचे निकष अन्यायकारक
👉निकषांत तातडीने बदल करा.
👉सर्व संकटग्रस्त शेतक-यांना नव्या हंगामासाठी पुरेसे पिककर्ज द्या.

👉शेतकरी प्रश्नांवर सुरु असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कर्ज माफी पूर्वी थकीत कर्जदारांना खरीप निविष्ठांसाठी दहा हजार रुपये तातडीचे पिककर्ज देण्या संदर्भात शासनाने आदेश काढला आहे. आदेशामध्ये असे कर्ज मिळविण्यासाठी अनेक अटी लादण्यात आल्या आहेत. सदरच्या अटींमुळे बहुतांश गरजू व संकटग्रस्त शेतकरी या कर्ज मदतीपासून वंचित राहणार आहेत.

👉शासनाने आदेशात अशा कर्जासाठी ३० जून २०१६ रोजी थकीत असलेल्यांनाच पात्र ठरविले आहे. प्रत्यक्षात ३१ मार्च २०१७ रोजी पर्यंत जे शेतकरी कर्जफेड करू शकलेले नाहीत व त्यामुळे नवे पिककर्ज घेऊ शकलेले नाहीत त्या सर्वांनाच अशा तातडीच्या कर्जाची नितांत आवश्यकता आहे. सरकार मात्र वस्तुस्थितीकडे जाणीवपूर्वक डोळेझाक करत आहे.

👉तातडीच्या कर्जमाफीसाठी कोणास अपात्र करावे या विषयी शासनादेशामध्ये मोठी यादी दिली आहे. आदेशात दिलेल्या यादीप्रमाणे या सर्वांना कर्जासाठी अपात्र केल्यास एकूण शेतक-यांपैकी खूपच थोडे शेतकरी कर्ज मिळण्यासाठी पात्र ठरणार आहेत.

👉अपात्रतेचे हे निकष शेती व ग्रामीण वास्तवाशी सरकारी पक्षाची नाळ तुटलेली असल्याचेच लक्षण आहे.

👉आदेशानुसार शासकीय नोकरीत किंवा अनुदानित संस्थेत नोकरीस असणारांना अशा कर्जासाठी अपात्र ठरविण्यात आले आहे. ग्रामीण भागात अजूनही खाते फुटले नसल्याने अनेक भावांची नावे एकाच उता-यावर व रेशन कार्डवर एकत्रच असतात. मात्र त्यांचे व्यवहार वेगवेगळे असतात. ब-याचदा जमीन वहिवाटही  वेगवेगळा असतो मात्र उतारा संयुक्त असतो. अशा परिस्थितीत त्यापैकी एखादा नोकरीत असेल तर  उता-यावरील सर्वच भावांना अशा कर्जापासून वंचित राहावे लागणार आहे. अनेक गरजू व संकटग्रस्त  शेतक-यांवर यामुळे अन्याय होणार आहे.

👉ग्रामीण भागात अनेक गरीब शेतक-यांनी जमिनी विकून किंवा गहाण टाकून मुलाबाळांची शिक्षणे केली आहेत. संस्थांमध्ये नोक-या मिळाव्यात यासाठी लाखोंची कर्ज अंगावर घेत देणग्या दिल्या आहेत. अनेकांचा हा बोजा अद्याप फिटलेला आही. असे शेतकरी अद्यापही अत्यंत अडचणीत आहेत. असे असताना सरसकट नोकरी असणारांना कर्ज नाकारणे अन्यायकारक आहे.

👉आदेशामध्ये विविध निवडणुकांमध्ये निवडून आलेल्यांना कर्जासाठी अपात्र ठरविण्यात आले आहे. जे निवडून आले आहेत व सक्षम आहेत त्यांना अशी मदत नाकारण्यास कुणाचाच विरोध असण्याचे कारण नाही. परंतु सरसकट सर्वच निवडून आलेले सक्षम आहेत असे मानून वर्तन करणे हास्यास्पद आहे.  अगदी जिल्हा परिषद, पंचायत समिती, सहकारी दुध संघ, कृषी उत्पन्न बाजार समिती, साखर कारखाना, सुत गिरणी, नागरी बँका यामध्ये निवडून गेलेले सारेच सरसकट सक्षम आहेत असे सरकारचे आकलन आहे. त्या सर्वांना कर्जासाठी अपात्र ठरविण्यात आले आहे. लोकशाही निवडणुकांबाबत आपले आकलन काय आहे याचे अत्यंत दिवाळखोर प्रदर्शन या अटीतून सरकारने केले आहे. पैसे असणारेच निवडून जिंकू शकतात हेच अधिकृतरीत्या मान्य करण्याचा हा प्रकार आहे. ज्या अर्थी तो निवडून आला त्या अर्थी तो श्रीमंतच असला पाहिजे असा सरळ अर्थ शासनाने ‘अधिकृतरीत्या’ काढला असल्याचे यामुळे स्पष्ट झाले आहे.

👉दलित, आदिवासींसह आपण अनेक प्रवर्गांसाठी निवडणुकीत राखीव जागा ठेवल्या आहेत. अशा प्रवर्गातून आलेले व दुध संघासारख्या निवडणुकांमधून निवडून आलेले सारेच श्रीमंत किंवा सक्षम आहेत, ते संकटग्रस्त नाहीत असे सरकारचे सरसकट आकलन दिसते आहे. सरकारचे हे आकलन दुरुस्त करण्याची गरज आहे.

👉कुटुंबातील कोणा एकाच्या नावे जरी चार चाकी वाहन असेत तरी अशा कुटुंबाला कर्जासाठी  अपात्र ठरविण्यात आले आहे. ग्रामीण भागात शेतीमालाची वाहतूक करण्यासाठी शेतकरी अत्यंत जीर्ण वाहने अत्यल्प कींमतीत विकत घेत असतात. अशा शेतक-यांनाही या अटीमुळे वंचित राहावे लागणार आहे.

👉कुटुंबाची शेती एकत्र आहे, रेशन कार्ड सुद्धा एकत्रच आहे मात्र व्यवहार वेगळे वेगळे आहेत अशीच कुटुंब व्यवस्था आज ग्रामीण भागात प्रचलित आहेत. अशा परिस्थितीत घरातील अशा विभक्त व्यवहार असणा-या चार चाकी वाहन धारकांमुळे इतर सर्वांनाच कर्जासाठी अपात्र ठरविणे अत्यंत अन्यायकारक आहे.

👉राज्यात सध्या कर्जमाफीचे निकष ठरविण्याची प्रक्रिया सुरु आहे. शेतकरी संप व  आंदोलनाचा परिणाम म्हणून निकष समिती बनविण्यात आली आहे. निकष समितीमध्ये शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी व शासनाचे प्रातिनिधी असणार आहेत. निकष अद्याप ठरलेले नाहीत. असे असताना तातडीचे कर्ज मिळविण्यासाठी शासनाने आदेश काढून वरील निकष जाहीर केले आहेत. सदरचे कर्ज मिळविण्यासाठीचे हेच निकष येत्या काळात कर्जमाफीचे निकष म्हणून रेटण्याचा शासनाचा प्रयत्न असणार आहे.

👉असे झाल्यास राज्यातील बहुतांश शेतकरी कर्जमाफी पासून वंचित राहणार आहेत.  शेतकरी आपल्या वरील  हा अन्याय बिलकुल खपवून घेणार नाहीत.

👉बड्या कॉर्पोरेट कंपन्या, श्रीमंत लोकप्रतिनिधी, मोठे प्रक्रियादार, कारखानदारांना शेतक-यांसाठीच्या सोयी सवलतींचा, अनुदानांचा व कर्जमाफीचा गैरफायदा घेता येऊ नये यासाठी निकष हवेत असे सरकार सांगत होते. मात्र या निकषांच्या आडून सरकार गरजू व संकटग्रस्त शेतक-यांना वंचित ठेवणार असेल तर ही अत्यंत अन्यायकारक बाब आहे.

👉 सरकारने या सर्वाची दखल घेत तातडीच्या पिक कर्जासाठी काढलेला शासनादेश तातडीने दुरुस्त करावा. सर्व संकटग्रस्त व गरजू शेतक-यांना कर्जमाफी व नव्या हंगामासाठी पुरेसे कर्ज द्यावी.

समन्वय समिती,
*किसान क्रांती जन आंदोलन.*

Wednesday, September 30, 2015

लसुन लागवड

हवामान
 • रब्बी हंगामातील पिक असून लसूण वाढीच्या काळात थंड आणि किंचित दमट हवामान, तर गड्डा परिपक्व होताना काढणीच्या काळात कोरडे हवामान हवे असते. 
 • गड्ड्याची वाढ सुरू होण्यापूर्वी पानांची संख्या भरपूर असली आणि त्यांची वाढ चांगली झाली तरच अधिक उत्पादनाची हमी असते. 
 • ऑक्टोबर मध्ये लागण केल्यानंतर नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी या काळात रात्रीचे कमी तापमान झाडांच्या वाढीस पोषक ठरते.
 • फेब्रुवारी, मार्च या काळात रात्री तापमान कमीच राहते; परंतु दिवसाच्या तापमानात वाढ होते. 
 • हवेतील आर्द्रता कमी होते आणि गड्डा पोसू लागतो.
 • एप्रिल महिन्यात तापमान आणखी वाढते. या काळात गड्डे काढणीस येतात. 
जमीन
 • भुसभुशीत आणि कसदार लागते.
 • मध्यम काळ्या जमिनीत सेंद्रिय खतांचा पुरवठा चांगला असल्यास उत्पादन चांगले मिळते.
 • भारी काळ्या किंवा चोपण जमिनीत गड्ड्यांची वाढ चांगली होत नाही.
 • पाण्याचा चांगला निचरा न होणाऱ्या जमिनी टाळाव्यात. 
पूर्व मशागत
 • खोल नांगरट करून दोन ते तीन कुळवाच्या पाळ्या द्याव्यात.
 • हरळी, लव्हाळ्याच्या गाठी किंवा पूर्वपिकाची धसकटे वेचून घ्यावीत. 
 • एकरी ४ ते ६ टन शेणखत शेवटच्या कुळवणीद्वारे जमिनीत मिसळून द्यावे.
 • लागवडीसाठी २ x ४ किंवा ३ x ४ मीटर अंतराचे वाफे करावेत.
 • जमीन सपाट असेल तर दीड ते दोन मीटर रुंदीचे आणि १० ते १२ मीटर लांबीचे सरे करता येतात.
 • लसूण पाकळ्या टोकण करून लावाव्या लागतात.
 • निवडलेल्या पाकळ्या सपाट वाफ्यात १५ x १० सें.मी. अंतरावर व दोन सें.मी. खोलीवर लावाव्यात.
 • रुंदीशी समांतर वाफ्यात दर १५ सें.मी. अंतरावर खुरप्याने रेषा पाडून त्यात १० सें.मी. अंतरावर पाकळ्या उभ्या ठेवाव्यात व नंतर मातीने झाकून घ्याव्यात.
बिजप्रक्रिया
लागवडीपूर्वी पाकळ्या कार्बेन्डाझिम व कार्बोसल्फानच्या द्रावणात दोन तास बुडवून लागवड करावी. दहा लिटर पाण्यात २० मि.लि. कार्बोसल्फान व २५ ग्रॅम कार्बेन्डाझिम मिसळून द्रावण तयार करावे.

जाती
वाण
विशेषता
वाण
विशेषता
भीमा ओंकार
कंद मध्यम आकाराचे, घट्ट आणि पांढरे 
एका कंदात १८ ते २० पाकळ्या असतात 
लागवडीपासून १२० ते १३५ दिवसांत पीक तयार होते 
५.५ टन प्रति एकर उत्पादन मिळू शकते 
भीमा पर्पल
कंद मध्यम आकाराचे, घट्ट व जांभळे 
एका गड्ड्यात १६ ते २० पाकळ्या 
लागवडीपासून १३५ ते १५० दिवसांत पीक तयार होते 
६.५ टन प्रति एकर पर्यंत उत्पादन मिळू शकते.
साधा लसूण
या लसणाच्या पाकळ्या बारीक असून साल पांढरट असते. निघायला किचकट, अर्क व वास गावराण लसणापेक्षा कमी असून एका गड्ड्याचे वजन १५ ग्रॅमपर्यंत असते. या लसणाच्या पाकळ्या जास्त निघतात.
यमुना सफेद लसूण(जी २८२)
गड्डा घट्ट, पांढरा १ ते ६ पाकळ्यांचा असून ५.६ सेंमी जाड व ५.५ ते ६ सेंमी उंचीचा असतो. १४० ते १५० दिवसात काढणीला येतो. एकरी ७० ते ८० क्विंटल उत्पादन मिळते. 
गुजरात (जुनागढ) लसूण
हा लसूण अतिशय मोठ्या पाकळीचा साधारण १ किलोत १५ ते २० लसूण कांड्या बसतात. या लसणास स्वाद कमी व अर्क कमी असतो. परंतु अधिक उत्पन्न व दिसण्यास आकर्षक असल्याने प्रक्रिया उद्योजक, हॉटेल व्यावसायिक व्यवसायिक, मसाले उत्पादक निर्यातदार हा लसूण अधिक पसंत करतात, हा लसूण निवडायला सोपा असून टरफल मोठे असते.
गावराण लसूण
डेरेदार, आकर्षक व रंग पांढरा मिश्रीत फिक्कट जांभळा असतो. घट्ट असून मर कमी असते. कवच जाड, कुडी मोठी डेरेदार व सोलण्याच्या जागी विशिष्ट प्रकारची ठेवण असलेला व सोलायला सोपा असतो. आतल्या कुडीच्या वरही मध्यम जाड, चमकदार असतो. हा लसूण सोलताना नाकात झिणझिण्या आणणारा वास येतो व यात अर्क जास्त असतो. या लसणास स्वाद चांगल असून आयुर्वेद मुल्य अधिक आहे. हा लसूण खानदेश, मराठवाडा, विदर्भ या भागांमध्ये प्रसिद्ध आहे.
अॅग्रीफाउंड व्हाईट लसूण (जी ४१)
लागवडीपासून १२० ते १३५ दिवसात काढणीस येतो. गड्डा मध्यम ते मोठा साधारण जाडी ४ ते ४.५ सेंमी व उंची ४.५ सेंमी असते. गड्ड्यामध्ये १३ ते १८ पाकळ्या असून रंग पांढरा असतो. स्वाद मध्यम तिखट असून सरासरी एकरी ५० ते ६० क्विंटल उत्पादन मिळते.
श्वेता लसूण
गड्डा पांढरा शुभ्र, ५.२ सेंमी जाड व ५ सेंमी उंचीचा असतो. गड्ड्यात २२ ते ३३ पाकळ्या असतात. १३० ते १३५ दिवसात काढणीस तयार होऊन एकरी ४० क्विंटल उत्पादन मिळते.
गोदावरी लसूण
गड्डा मध्यम, जांभळट पांढरा असतो. गड्ड्यामध्ये २० -२५ पाकळ्या असतात. गड्डा ४.३५ सेंमी जाड व ४.३ सेंमी उंचीचा असतो. १४० ते १४५ दिवसात काढणीस तयार होऊन एकरी ४० ते ४५ क्विंटल उत्पादन मिळते.खत व्यवस्थापन
 • लसुन पिकाला एकरी ४० किलो नत्र, २० किलो स्फुरद व २० किलो पालाश लागते. लागवडीपूर्वी ५० टक्के नत्र व संपूर्ण पालाश व स्फुरद द्यावे. नत्राची राहिलेली मात्रा दोन हप्त्यांत विभागून द्यावी.
 • पहिली मात्रा लागवडीनंतर ३० दिवसांनी, तर दुसरी मात्रा ४५ ते ५० दिवसांनी द्यावी.
 • सुपर फॉस्फेट किंवा अमोनिअम सल्फेटचा वापर केल्यास आवश्‍यक गंधकाची मात्रा पिकास मिळू शकते, अन्यथा २५ किलो गंधक देण्यासाठी दाणेदार गंधकाचा वापर करावा.
 • पाकळ्यांची लागवड झाल्यानंतर कोरड्या वाफ्यात, पाटात आणि वरंब्यावर तणनाशक फवारावे, त्यासाठी १५ मि.लि. ऑक्‍सिफ्लोरफेन किंवा २५ मि.लि. पेंडीमिथॅलीन प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून वापर करावा.
 • तणनाशकाच्या वापरानंतर लगेच पाणी द्यावे किंवा लागवड करून पाणी दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी तणनाशक वापरले तरी चालते.
 • लागवडीसोबत तणनाशकाचा वापर केल्यामुळे जवळपास ३० ते ४० दिवस गवत उगवत नाही, त्यानंतर हलकी खुरपणी करणे आवश्‍यक असते. खोल नांगरट करून हरळीच्या काशा किंवा लव्हाळ्याच्या गाठी वेचणे हाच पर्याय वापरावा.
पाणी व्यवस्थापन
 • प्रकिया युक्त लसुन पाकळ्या कोरड्यात लावल्यानंतर लगेच पाणी द्यावे. उगवण झाल्यानंतर आठ ते दहा दिवसांच्या अंतराने जमिनीच्या मगदुराप्रमाणे पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. 
 • सूक्ष्म सिंचनासाठी १२० सें.मी. रुंदीचे, ४० ते ६० मीटर लांबीचे व १५ सें.मी. उंचीचे गादी वाफे ट्रॅक्‍टरला जोडता येणाऱ्या सरी यंत्राने तयार करावेत.
 • सरी यंत्राच्या फाळाची दोन टोके १६५ सें.मी. अंतरावर कायम करून ट्रॅक्‍टर चालविला, तर १२० सें.मी. रुंदीचा गादी वाफा तयार होतो.
 • वाफ्याच्या दोन्ही कडेला ४५ सें.मी. रुंदीच्या दोन सऱ्या तयार होतात. या जागेचा उपयोग फवारणी करणे, गवत काढणे, पिकांचे निरीक्षण करणे इत्यादी कामांसाठी होतो. 
रोग व किडींचे नियंत्रण
तपकिरी करपा
जांभळा करपा
पानांवर पिवळसरतपकिरी रंगाचे लांबट चट्टे पडतात. चट्ट्यांचा आकार वाढत जाऊन पाने सुकू लागतात. पिकांच्या बाल्यावस्थेत हा रोग आल्यास झाडांची वाढ खुंटून गड्डा लहान राहतो व प्रसंगी पूर्ण झाड मरते.
पानांवर सुरवातीला खोलगटलांबटपांढुरके चट्टे पडतात. चट्ट्यांच्या मधला भाग जांभळा व नंतर काळपट होतो. असे अनेक चट्टे एकमेकांना लागून पडल्यामुळे पाने काळी पडतात व वाळतात.
नियंत्रन
१० ते १५ दिवसांच्या अंतराने २५-३० ग्रॅम मॅंकोझेब किंवा २० ग्रॅम कार्बेन्डाझिम प्रति दहा लिटर पाण्यात कीडनाशकांसोबत आलटून पालटून फवारावे. फवारणीच्या द्रावणात स्टिकर जरूर वापरावे.

फुलकिडे
लक्षण
नियंत्रन
पूर्ण वाढलेली कीड व त्यांची पिल्ले पानांतून रस शोषून घेतात, त्यामुळे पानांवर पांढरे चट्टे पडतात. पाने वाकडी होऊन वाळतात. या किडीची पिल्ले व प्रौढ दिवसा पानांच्या बेचक्‍यात लपून राहतात व रात्री पानांतून रस शोषतात. 
पाकळ्या उगवून आल्यानंतर एकरी चार किलो फोरेट वाफ्यात वापरावे व पाणी द्यावे; तसेच दर १२ ते १५ दिवसांनी सायपरमेथ्रीन १० मि.लि. प्रति दहा लिटर पाण्यात स्टिकरसह मिसळून फवारावे.

सूत्रकृमी
लक्षण
नियंत्रन
लसणाच्या खोडालगत पेशींमध्ये शिरतात. पेशींचा भाग पोखरतात व तो भाग भुसभुशीत बनतो, सडतो व त्याला वास येतो. खोडाचा भाग सडल्यामुळे झाड सहज उपटून येते व मुळाचा भाग तसाच जमिनीत राहतो.
पिकाची फेरपालट हा अत्यंत प्रभावी उपाय आहे. तसेच पिका भोवताली झेंडू लागवड केल्यास प्रादुर्भाव कमी होतो.

अधिक उतपन्नासाठी 
 • लसणाच्या पाकळ्या उभ्या लावाव्यात, त्यामुळे उगवण एकसमान होते. 
 • लागवडीपूर्वी लसणाच्या पाकळ्या कार्बेन्डाझिम व कार्बोसल्फानच्या द्रावणात दोन तास बुडवून लागवड करावी. 
 • तणनाशक फवारल्यानंतर त्याचा संपर्क पाण्याशी एक ते दोन तासांत आला पाहिजे हे लक्षात ठेवावे. 
 • लव्हाळा किंवा हरळीकरिता ग्लायफोसेट तणनाशक वापरू नये. 
 • ठिबक किंवा तुषार सिंचनावर लसणाची वाढ चांगली होते, उत्पादन अधिक येते, पाण्याची बचत होते, तसेच तणांचा व किडींचा उपद्रव कमी होतो.

Thursday, February 5, 2015

वांगी

हवामान 

वांगे हे कोरड्या आणि उष्ण हवामानात येणारे पीक आहे. ते 13 ° से पासून 21 ° से तापमानात घेतले जाते. वांगी पिकाला ढगाळ हवामान व एकसारखा पाऊस मानवत नाही. 

जमीन
जमिनीची तयारी चांगल्या वाढीसाठी व विकासासाठी पाण्याचा निचरा होणारीसुपीक व मध्यम काळी जमीन निवडावी. 

मशागत
प्रथम जमिनीची आडवी-उभी नांगरट व कुळवांच्या पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करावी. 

बियाणे 
रुचिराप्रगतीपुसा पर्पल लॉगअरुणापुसा पर्पल राउंडपुसा पर्पल क्लस्टरपुसा क्रांतीमांजरी गोटाकृष्णाफुले हरितफुले अर्जुनको-1,को-व पी.के.एम. 1.
हरित कृष्णा, MH१०

सुधारित जातीसाठी हेक्‍टरी 400 ते 500 ग्रॅम तर संकरित जातीसाठी हेक्‍टरी 120 ते 150 ग्रॅम बी पुरेसे असते. 

बिज प्रक्रिया 
पेरणीपूर्वी बियाण्यास 10%फॉरेट 20 gm / थायरम 3gm किंवा कार्बनडॅझिम (बाविस्टिन,सहारा) 1gm/kg ची प्रक्रिया करा. रासायनिक प्रक्रीये नंतर ट्रायकोडर्माची@5gm/kg प्रक्रिया करा. नंतर बियाणे सावलीत सुकवून पेरणी करा. लागवडी आधी रोपांची VAM + नत्र स्थिरिकरण जीवाणू सोबत प्रक्रिया केली असता सुपर फॉस्फेटची 50% तर नत्राचि 25% बचत होते. 

लागण कालावधी 
हंगाम
बियाणे पेरणी  
रोपे लागण
उन्हाळी
जानेवारी २रा आठवडा
फेब्रुवारी
पावसाळी
जुन २रा आठवडा
जुलै-ऑगस्ट
रब्बी किंवा हिवाळी
सप्टेंबर अखेरपर्यंत
ऑक्टोबर-नोव्हेंबर 

लागण पद्धत 
वांग्याची रोपे तयार करणेसाठी गादीवाफे साधारणतः 3 x 2 मीटर आकाराचे तयार करूनवाफा 1 मीटर रुंद व 15 सें.मी. उंच करावा. 
लागवड
अंतर CM
लागवड
अंतर CM
हलक्‍या जमिनसाठी
75 x 75
कमी वाढणाऱ्या जातीसाठी
90 x 75 
मध्यम जमिनीसाठी
90 x 75
संकरित जातीसाठी
90 x 90
भारी जमिनीसाठी
120 x 90
जास्त वाणाऱ्या जमिनीसाठी
120 x 90
वांग्यासाठी 25 मायक्रॉन जाडीचा काळा व सोनेरी रंगाचा मल्चिंग पेपर वापरला जातो. काळा रंग आतील बाजूला व चंदेरी/सोनेरी रंग वरच्या बाजूला ठेवून दोन्ही बाजूने पेपर जमिनीत गाडून लागवड केली जाते. 

खतव्यवस्थापन
प्रत्येक वाफ्यात चांगले कुजलेले शेणखत दोन घमेले टाकावे व 200 ग्रॅम संयुक्त रासायनिक खत टाकावे. 
रोप लागवडीपूर्वी जमिनीची नांगरट करून चांगली मशागत करून (एकरी 3 ते 4 टन) शेणखत मिसळून द्यावे. 
रोपांच्या जोमदार वाढीसाठी उगवणीनंतर 10 ते 15 दिवसांनी प्रत्येक वाफ्यास 50 ग्रॅम युरिया खत दोन ओळीमध्ये काकरी पाडून द्यावे. 

वांगी पिकासाठी मध्यम काळ्या जमिनीसाठी एकरी 60 किलो नत्र, 20 किलो स्फुरद व 20 किलो पालाश आवश्‍यक आहे. संपूर्ण स्फुरद व पालाश व अर्धे नत्र लागवडीच्या वेळी द्यावे आणि अर्धे उरलेले नत्र लागवडीनंतर तीन समान हप्त्यात विभागून द्यावे. पहिला हप्ता लागवडीनंतर एक महिन्यानेदुसरा हप्ता त्यानंतर एक महिन्याने आणि शेवटचा हप्ता लागवडीनंतर तीन महिन्यांनी द्यावा. 

रासायनिक खते चांगल्या वाढीसाठी 20 किलो नत्र (43 किलो युरिया),20 किलो स्पुरद (125 किलो एसएसपी) व 20 किलो पालाश (34 किलो एमओपी) प्रती एकर लागवडीपूर्वी सरीमध्ये टाकावे. 

लागवडीनंतर 10-15 दिवसात 19:19:19 आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये 2.5 ते 3 ग्रॅम प्रती लिटर पाण्यात मिसळून फवारावे.

चांगल्या वाढीसाठी 20 किलो नत्र (43 किलो युरिया) प्रती एकर लागवडीनंतर 20 आणि 45 दिवसांनी द्यावे.

पाण्यात विरघळणारी खते चांगल्या वाढीसाठी लागवडीनंतर 20-25 दिवसांनी 19:19:19 5gm/Ltr पाण्यातून फवारा. 

चांगल्या फुलधारणा व फळांचा विकास होण्यासाठी फुलो-यापूर्वी 19:19:19 5gm/Ltr आणि 0:52:34 5gm/Ltr पाण्यातून फळे तयार होताना फवारा. 

सुक्ष्म अन्नद्रव्ये  लागवडीनंतर 40-45 दिवसांनी २० टक्के बोरॉन 1 ग्रॅम आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये 2.5 ते 3 ग्रॅम प्रती लिटर पाण्यात मिसळून फवारावे. पिक फुलोरा अवस्थेत असताना 0:52:34 4 ते 5 ग्रॅम + मायक्रोन्युट्रीएंटस् (ग्रेड नं २) 2.5 ते 3 ग्रॅम प्रती लिटर पाण्यात मिसळून फवारावे. पिक फळ धारणा अवस्थेत असताना 0:52:34 4 ते 5 ग्रॅम + बोरान 1 ग्रॅम प्रती लिटर पाण्यात मिसळून फवारावे. पिक फळ पोसत असतांना 13:0:45 4 ते 5 ग्रॅम + कॅल्शियम नायट्रेट 2 ते 2.5 ग्रॅम प्रती लिटर पाण्यात मिसळून फवारावे. अन्नद्रव्यांची कमतरता लोह कमतरता. खालची पाने हिरवीनवी पाने पांढरट दिसतात. नियंत्रण- चिलेटेड आयर्न एकरी 125-150 ग्रॅम 130 लिटर पाण्यातून फवारा संप्रेरके पिकाच्या प्राथमिक वाढीच्या काळात 1Ltr/acre ह्युमिक असिड किंवा 5 kg/acre ग्रॅन्युअल्स वापरल्यास त्याचा पिकाच्या वाढीवर चांगला परिणाम होतो. पिकाच्या चांगल्या वाढीसाठी एकरी ट्रायकोन्टनल होर्मोन 500 ppm हे 200Ltr पाण्यातून 100ml इतक्या प्रमाणात 15दिवसांच्या अंतराने 2-3 वेळा फवारा. 

पाणी व्यवस्थापन 
हलके पाणी द्यावे. रोप 5 ते 6 आठवड्यात रोपे 12 ते 15 सें.मी. उंचीची झाल्यावर लागवड करावी. 
उन्हाळी हंगामात पिकाला 5-6 दिवसाच्या अंतराने व हिवाळ्यात 1 आठवड्याच्या अंतराने पाणी द्या. पावसाळ्यामध्ये पिकाची पाण्याची गरज पाहून पाणी द्यावे. 
ठिबक सिंचन आराखडा - 
प्रथमतः 120 सें.मी. रुंदीचे गादीवाफे व दोन गादीवाफ्यातील अंतर 30 सें.मी. असे गादीवाफे तयार करून घ्यावेत. प्रत्येक गादीवाफ्याच्या मधोमध लॅटरल टाकून घ्याव्यात. 
नंतर या लॅटरल लाइनवर 60 सें.मी. अंतरावर 4 लिटर प्रतितास ड्रीपर व दोन ट्रिपरमधील अंतर 50 सें.मी. असेल तर 3.5 लिटर प्रतितास क्षमतेचे ड्रीपर बसवावे. 
दोन लॅटरलमधील अंतर 1.5 मी. ठेवावे. 
लागवड करताना जोड ओळ पद्धतीने करावी. दोन ओळींमधील अंतर 90 सें.मी. आणि दोन रोपांमधील अंतर 75 किंवा 60 सें.मी. ठेवून लागवड करावी. 

तण व्यवस्थापन 
लागवडी/पेरणीनंतर लगेच परंतु पिक उगवण्यापूर्वी पेंडीमिथालीन 30 EC (स्टॉंम्प,धानुटॉप)150ml/15Ltr पाण्यातून फवारा. उभ्या पिकातील तणांच्या नियंत्रणासाठी पेरणीनंतर 30-35 दिवसांनी एकदा कोळपणी करावी. 

कीड नियंत्रण 
फुलकिडे आणि मावा 
इमीडाक्लोप्रिड70WG(अॅडमायर,अॅडफायर) 5gm किंवा इमीडाक्लोप्रिड 17.8SL (मीडीया,कॉनफिडोर) किंवा थायामेथोक्सॅम (मॅक्सिमा,अरेवा,अक्टारा) 10 gm/15 Ltr पाण्यातून 12 दिवसांच्या अंतराने 2 वेळा फवारा. 

कोळी 
या किडीमुळे उत्पादनात 35% घट होवू शकते.नियंत्रणासाठी स्पीरोमेसिफेन 22.9SC (ओबेरोन,वोल्टेज) 20ml किंवा प्रोपारगाईट 57EC (ओमाइट,सिंबा) 40ml/15Ltr पाण्यातून फवारा 

खोड आणि फळे पोखरणा-या अळ्या 
खोड आणि फळे पोखरणा-या अळ्यांच्या नियंत्रणासाठी प्रोफेनोफॉस 40% + सायपर मेथ्रिन 4% (रॉकेटप्रोफेक्स सूपर) 350ml किंवा प्रोफेनोफॉस 50% EC400ml /200Ltr पाण्यातून प्रती एकर फवारा. किंवा खोड आणि फळे पोखरणा-या अळ्यांच्या नियंत्रणासाठी इमामेक्टीन बेन्झोएट(प्रोक्लेम EM-1) 5% SG 7gm किंवा क्लोरॅंट्रॅनीलिप्रोल 18.5%SC (कोरॅजन) 6ml किंवा फ्लूबेनडामाइड 39.9SC (फेम) 5ml किंवा फ्लूबेनडामाइड 20WG(फ्लूटॉन टाकूमी)@10gm/15Ltr पाण्यातून फवारा. 

पांढरी माशी 
पांढ-या माशीमुळे उत्पादनात 40% घट होते व विषाणुजन्य रोगांचा प्रसार होतो.नियंत्रणासाठी अ‍ॅसीटामिप्रिड 20SP (धनप्रितरेकॉर्ड) 5gm किंवा डायफेनथीरॉन 50WP(पेगासास,पोलो) 20gm/15Ltr पाण्यातून फवारा 

रोग नियंत्रण 
भुरी 
या रोगामध्ये पानांवर पांढरी भुकटी दिसून येते नियंत्रणासाठी गंधक 500gm प्रती एकर 200Ltr पाण्यातून फवारा. 

रोप मर
थंड,ढगाळ हवानाम,उच्च आर्द्रता ओली माती व रोपांची गर्दी यामुळे मर रोग येण्याची शक्यता आहे. मर रोगामध्ये पिक पूर्णपणे मरून जाते. मेटालेक्सील 8%+ मॅनकोझेब 64%WP (रीडोमीन MZ,कॉरोमील) 2gm/Ltr पाणी याप्रमाणे पेरणीपूर्वी भिजवणी करा. 

बोकड्या रोग 
मावाच्या प्रादुर्भावामुळे पसरतो. 25%WG थायामेथोक्सॅम(क्रूसर,अक्टारा) @ 5gm/15 Ltr ची फवारणी करा. 

करपा
टेब्युकोनॅझोल 25ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यातून फवारा. पानावरील ठिपके क्लोरोथॅलोनील (कवचजटायु) @ 15gm/10Ltr किंवा प्रॉपिकॉनाझोल 25% EC (रडारटिल्ट) 10 ml/Ltr ची फवारणी. 

इतर समस्या 
पिवळेपणा 
पिवळेपणा कमी करण्यासाठी प्रोपिनेब 70WP 35gm+19:19:19 75gm/15 Ltr पाण्यातून फवारा. 

सुत्रकृमी 
सुत्रकृमी मुळे मुळ्यांची वाढ थांबते व उत्पादनावर परिणाम होतो. सुत्रकृमी नियंत्रणासाठी कार्बोफ्युरान 3G (फ्युराडन,डाइफ्युरान फ्युरी)@10-15kg/एकर प्रदुर्भावाच्या तीव्रतेनुसार वापरा. 

कापणी आणि काढणी पश्चात तंत्र 
योग्य अवस्था आणि तंत्र 
रोप लावणीनंतर 10-12 आठवड्यांनी फळे तयार होतात. फळे पूर्ण टवटवीत आणि चकचकीत असतानाच काढणी करावी फार कोवळी फळे काढल्यास उत्पादनात घात होते व जुन फळे ग्राहकांच्या पसंतीस उतरत नाही. 4-5 दिवसांच्या अंतराने 10-12 वेळा वांग्याचे तोडे करावेत.साधारणपणे 3-3.5 महिने वांग्याची काढणी चालू असते.

एकात्मिक कीड व्यवस्थापन - 
सूत्रकृमींचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी ज्या जमिनीत टोमॅटोमिरची भेंडी किंवा वेलवर्गीय भाज्या ही पिके घेतली असल्यास तिथे वांग्याची लागवड करू नये.

रोपासाठी तयार केलेल्या वाफ्यात कार्बोफ्युरॉन 30 ग्रॅम टाकावे. तसेच रोपावर डायमेथोएट 30 टक्के प्रवाही 10 मिलि 10 लिटर पाण्यातून फवारावे. 
रोपांची पुनर्लागवड करताना रोपे इमिडॅक्‍लोप्रीड (10 मि.लि. प्रति 10 लिटर पाणी) च्या द्रावणामध्ये बुडवून नंतर लागवड करावी. 
कामगंध सापळे 10 (दहा) प्रतिहेक्‍टर वापरावेत तसेच यातील सेप्टा (ल्युसी ल्युर) दर दोन महिन्यांनी बदलावी. 
लागवडीनंतर 45 दिवसांनी तुडतुडेमावा व पांढरी माशी या किडी आढळल्यास डायमेथोएट 30 टक्के प्रवाही 10 मि.लि. किंवा मिथिल डिमेटॉन 25 टक्के प्रवाही मि.लि. किंवा ट्रायझोफॉस 10 मिलि 10 लिटर पाण्यातून फवारावे. 

रसशोषक किडींच्या नियंत्रणासाठी बी पेरल्यानंतर 2 आठवड्यांनी 20 मिली मॅलेथीऑन 50% किंवा 2.5 मिली फॉस्फोमीडॉन 85% किंवा डायमेथोएट 30% 10 मिली 10 लिटर पाण्यातून फवारा. 
लागवडीनंतर 20 दिवसांनी दर आठवड्याला किडलेले शेंडे व फळे आढळल्यास ती गोळा करून नष्ट करावीत किंवा खोल खड्ड्यात पुरून टाकावीत. या किडीसाठी सायपरमेथ्रीन (25 टक्के प्रवाही) 5 मिलि किंवा लॅम्बडा सायहॅलोथ्रीन 3 मि.लि. 10 लिटर पाण्यातून फवारावे. 
वांगी पिकावर कोळी आढळल्यास पाण्यात मिसळणारे गंधक 30 ग्रॅम किंवा डायकोफॉल 20 मि.लि. प्रति 10 लिटर पाण्यातून फवारावे. 
वांग्यामधील बोकड्या/ पर्णगुच्छ याचा प्रसार तुडतुडे या किडीमुळे होतो. यासाठी तुडतुड्यांचे वरीलप्रमाणे नियंत्रण करावे.

30 ते 40 टन प्रति हेक्‍टर उत्पादन मिळू शकते.