भारतात शेळयांच्या प्रमुख 25 जाती आढळतात. शेळ्यांचा व्यावसायिक उपयोग करून दुध उत्पादन, लोकर / मोहर उत्पादन, मांस उत्पादन करता येते. दोन शेळ्या एका छोट्या कुटुंबाचा सक्षम उपजीविकेचा आधार बनू शकतात. शेळीच्या जाती निवड आणि जोपासना अधिक वाचा...
शेळी पालनामध्ये गोठा पद्धतीला महत्व आहे. कमीत कमी खर्चात व्यवस्थित संगोपन केल्यास जास्तीत जास्त नफा राहतो. शेळीच्या निवासावरून मुक्त, अर्धबंदिस्त आणि बंदिस्त असे शेळी पालनाचे प्रकार पडतात. गोठा पद्धतीबाबत अधिक वाचा...
साधारणपणे शेळ्यांना दररोज तीन ते चार किलो हिरवा चारा व एक किलो वाळलेला चारा लागतो. त्याचप्रमाणे शेळ्यांच्या खाद्यामध्ये झाडपाला आवश्यक आहे. त्याचबरोबर गाभण शेळी, दूध देणारी शेळी, पैदाशीच्या बोकडासाठी पूरक आहाराची आवश्यकता अधिक वाचा...
वाढते तापमान आणि कमी पर्जन्यामुळे पाण्याचे दुर्भिक्ष या बदलत्या हवामानाचा शेळ्या- मेंढ्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होतो. सर्वसाधारणपणे शेळ्या- मेंढ्यांचा पैदासकाळ हा पावसाळ्याच्या सुरवातीला येतो; मात्र पैदाशीसाठी सक्षम शरीर यंत्रणा तयार होण्यासाठी उन्हाळी हंगामातच त्यांची काळजी कशी घ्यायची अधिक वाचा...
शेळी ही निसर्गतः काटक व रोगांना कमी बळी पडते; मात्र अनेक कारणांमुळे विविध रोगांचे संक्रमण होऊन शेळीपालन व्यवसायाचे व्यवस्थापन बिघडण्याची दाट शक्यनता असते. शेळी संगोपानामध्ये आरोग्य व्यवस्थापन अधिक वाचा...
दुर्लक्ष नको शेळीच्या आरोग्याकडे...
शेळ्यांचे कमी खर्चात चांगल्या प्रकारे व्यवस्थापन करता येते. शेळी व्यवस्थापन करताना सकस चारा, गाभण शेळ्यांची - करडांची काळजी घ्यावी. आरोग्याच्यादृष्टीने वेळच्या वेळी लसीकरण केल्यास संसर्गजन्य रोगांपासून संरक्षण होऊन अपेक्षित फायदा शेळीपालकाला मिळू शकतो.
लसीकरण तक्ता
(पशु वैद्यकाचा सल्ला घ्यावा)
रोग
|
महिना
|
मात्रा (शेळी)
|
मात्रा (करडे)
|
फुफ्फुसाचा दाह
|
जानेवारी
|
२ मि.लि. कातडीखाली
|
२ मि.लि. कातडीखाली
|
घटसर्प
|
मार्च - सप्टेंबर
|
५ मि.लि. कातडीखाली
|
५ मि.लि. कातडीखाली
|
देवी
|
एप्रिल
|
कातडीवर (कानाचे टोक/शेपटीखाली
|
कातडीवर (कानाचे टोक/शेपटीखाली
|
आंत्रविकार
|
मे - नोव्हेंबर
|
५ मि.लि. कातडीखाली
|
५ मि.लि. कातडीखाली
|
बुळकांडी
|
मे - नोव्हेंबर
|
१ मि.लि. कातडीखाली
|
१ मि.लि. कातडीखाली
|
फऱ्या
|
जुलै
|
५ मि.लि. कातडीखाली
|
५ मि.लि. कातडीखाली
|
पायलाग / लाळ्याखुरकत
|
ऑगस्ट
|
५ मि.लि. कातडीखाली
|
५ मि.लि. कातडीखाली
|
धनुर्वात
|
पहिल्या व दुसऱ्या महिन्यात
|
पुढे प्रतिवर्ष बूस्टर इंजेक्शन द्यावे.
|
पुढे प्रतिवर्ष बूस्टर इंजेक्शन द्यावे.
|
रोग व उपचार (पशु वैद्यकाचा सल्ला घ्यावा)
इ - कोलाय जंतू प्रादुर्भाव
बाधित करडांना ताबडतोब वेगळे ठेवावे. त्यांना मीठ व पाणी यांचे द्रावण पाजावे व गरम कापडात किंवा घोंगडीत गुंडाळून ठेवावे. इ. कोलाय हा जीवाणू असल्यामुळे प्रतीजैवीके, सलाईन, अ, ब, क, जीवनसत्व इंजेक्शन द्यावी.
आंत्रविकार / हगवण
जास्त पिष्टमय खाल्ल्याने आम्लीय अपचन होऊन तीव्र हगवण लागते. शेळ्या दूषित, टाकलेले, उरलेले अन्न खाणार नाहीत, याची काळजी घेणे गरजेचे आहे. हगवणीला कारणीभूत घटकांचा योग्य तो उपचार अथवा प्रतिबंध करावा. जसे की हगवण थांबविणाऱ्या औषधांचा उपयोग, प्रतिजैविक गोळ्या (पेसुलिन, फॅजाल, पॅबाडीन इ.) सोबत इलेक्ट्रो लाइटची पावडर हे सर्व एकत्र करून स्वच्छ पाण्यातून दोन ते तीन वेळा पाजावे.
तीव्र हगवणीच्या प्रकारात शिरेतून इलेक्ट्रो लाइट व ऊर्जेचे द्रावण द्यावे.
अचानक अशी समस्या आली तर पाण्यातून खाण्याचा सोडा पाजावा अथवा तीव्रता जास्त असल्यास शिरेद्वारे सोडाबायाकार्बचे द्रावण द्यावे, सोबत जीवनसत्त्वे व कोणतेही एक प्रतिजैविक द्यावे.
जंत
प्रकार - १) पट्टी कृमी २) पर्णकृमी ३) गोलकृमी
जानेवारी ते एप्रिल दरम्यान गाभण शेळ्यांना स्ट्रायगॉलस प्रकारचे जंत होण्याची शक्यता असते. एप्रिल ते जुलै महिन्याच्या दरम्यान शेळ्यांना यकृतकृमी व पट्टीकृमी प्रकारच्या जंतांचा प्रादुर्भाव होतो. त्यासाठी त्यांना अलबेंडाझॉंल ५ mg/ ltr प्रति किलो वजनास याप्रमाणे औषध द्यावे. उन्हाळ्यात गोठ्यातील मातीमध्ये चुना व कॉस्टिक सोडा मिसळावी.
धनुर्वात
जखम हायड्रोजन पेरॉक्साईडने स्वच्छ धुऊन घ्या. बाधित शेळ्यांना अंधाऱ्या व शांत जागेत ठेवावे. शेळीला तोंडाच्या स्नायूंमध्ये ताठरपणा जानवला, सर्वांगाला कंप सुटला तर डॉक्टरांच्या सल्ल्याने कवटीच्या मधील फोरेमिन मग्नम् छिद्रातून धनुर्वात प्रतिविष द्यावे. जखमांना वेळीच औषधोपचार हा सर्वात चांगला उपचार आहे. गाभन काळात शेळीला पहिल्या व दुसऱ्या महिन्यात अशी दोन धनुर्वातची इंजेक्शन द्यावीत व पुढे प्रतिवर्ष बूस्टर इंजेक्शन द्यावे.
घटसर्प
- हा अतिशय वेगाने पसरणारा साथीचा रोग आहे. सांसर्गिक प्राण्याची विष्ठा, लाळ, चारा, पाणी यांच्याशी संपर्कात आल्याने या रोगाची लागण होते. या रोगात जनावराचे तापमान अचानक खूप वाढते. शेळी चारा खाणे बंद करते. रवंथ न करता नाक व तोंडातून स्राव बाहेर पडतो.
संसर्गजन्य फुफ्फुसदाह -
हा संसर्गजन्य रोग आहे. या रोगाचे लक्षण म्हणजे कोरडा खोकला, नाकातून पाण्यासारखा द्रव येतो.
फऱ्या -
हा रोग तीव्रपणे पसरणारा संसर्गजन्य रोग आहे. या रोगामध्ये खूप ताप येतो, पाय व सांधे यांना सूज येते, या सुजेवर दाबले असता दुखते व गरम लागते. या रोगामुळे जनावरास नीट चालवतही नाही, त्यामुळे ते लंगडते, म्हणूनच या रोगास "एकटांग्या' असेही म्हणतात.
लाळ्या खुरकूत -
हा एक झपाट्याने वाढणारा संसर्गजन्य रोग आहे. याचा प्रसार हवा, पाणी व रोगी प्राण्याच्या संपर्कात आलेला चारा यामुळे होतो. यामध्ये शेळ्यांची भूक मंदावून त्या अशक्त बनतात. दुभत्या शेळ्यांचे दूध कमी होते, खूप ताप येतो व तोंडातून स्राव वाहतो. तोंडात पांढऱ्या रंगाचे फोड येतात, खुरांतही फोड येऊन जखमा होतात, त्यामुळे खाणे आणि चालणे अशक्यय होते. शेळ्या दगावण्याचीही शक्यशता असते.
आंत्रविषार :
प्रामुख्याने हा आजार चांगल्या पोषित, पौष्टिक चाऱ्यावर चरणाऱ्या, मांसाने भरीव असणाऱ्या मेंढ्यांना व शेळ्यांना बाधित करतो. कोकरांनी आजारास बळी पडण्याचे प्रमुख कारण म्हणजे जास्त प्रमाणात प्यायलेले दूध होय. प्रादुर्भाव झालेली नवजात कोकरे हवेमध्ये उडी घेऊन जमिनीवर कोसळतात, थरथर कापतात व काही मिनिटांतच गतप्राण होतात.
उपाययोजना - शेळ्या, मेंढ्यांना पावसाळ्याच्या सुरवातीला लस टोचून घ्यावी. कोकरांना लस दिल्यानंतर तीन आठवड्यांनी बूस्टर डोस द्यावा. लस टोचल्यानंतर रोगप्रतिकारक शक्ती तयार होण्याकरिता 21 दिवसांचा कालावधी लागतो. प्रादुर्भावादरम्यान दीर्घक्रियाशील प्रतिजैविके योग्य मात्रेत द्यावीत.
फाशी :
हवामानातील अचानक बदल, मुसळधार पाऊस व दुष्काळ परिस्थितीमुळे फाशीचा रोग पसरतो. यात खूप ताप येतो, जनावर थरथरते, तोल जातो, नाकातोंडातून काळपट रक्तस्राव होतो. श्वाोस घेण्यास त्रास होतो व शेळी-मेंढी ताबडतोब मरते.
उपाययोजना - पशुतज्ज्ञांच्या सल्ल्याने प्रतिबंधक लसीकरण करावे. मेलेल्या शेळ्या-मेंढ्या वर-खाली चुनखडी (चुना) टाकून खोल खड्ड्यात पुराव्यात. त्यांची कातडी विकू नये. शवचिकित्सा करू नये.
जरबा :
याचा प्रसार चावणाऱ्या चिलटांपासून म्हणजेच अप्रत्यक्षरीत्या होतो. जास्त पाऊस व ढगाळ वातावरणामध्ये चिलटांची उत्पत्ती डबक्याजत पाणी साठल्यामुळे अधिक प्रमाणात होते. याची लक्षणे म्हणजे तोंडाला गरे पडतात, तोंडातील आतील भाग लालसर पडतो, काही वेळा लाळ येते, शेळ्या-मेंढ्या कुचंबतात, डोळे लाल होतात, जनावर लंगडू लागते, छातीला व जबड्याखाली जखमा होतात.
उपाययोजना -
पावसाळ्यात सायंकाळी वाडग्यात करंज, कडुनिंब, निरगुडीच्या पाल्याची धुरी करावी. डबकी व साचलेल्या पाण्यावर रॉकेल फवारणी करावी. असे केल्याने चिलटांचे प्रजनन कमी होऊन संख्या वाढत नाही. बाधित मेंढीस पशुवैद्यकाच्या सल्ल्यानुसार प्रतिजैविके योग्य मात्रेत द्यावीत. कोमट पाण्यात मीठ टाकून तोंड धुवावे.
बुळकांडी :
या आजारात शेळ्या-मेंढ्यांमध्ये ताप येणे, नाकातून पाणी येणे, चिकट व रक्तमिश्रित जुलाब होणे इत्यादी प्रमुख लक्षणे दिसून येतात.
उपाययोजना - पशुतज्ज्ञांकडून नियमित पी.पी.आर. लस टोचून घेणे. वाडग्यात स्वच्छता पाळावी. आजारी शेळ्या, मेंढ्यांना वेगळे ठेवावे.
माझीशेती मार्फत शेलीपालनाचे संपुर्ण व्यवसाय शोध अहवालापासून मांस प्रक्रिया व निर्यातीबाबत सविस्तर ३ दिवस दररोज २ सत्रांमध्ये प्रशिक्षण दिले जाते. तज्ञ मार्गदर्शक, देशी आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेची सफर असा प्रशिक्षणाचा भाग आहे. प्रशिक्षणाबाबत अधिक वाचा...
गरजू विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी तुम्ही हातभार लावा. प्रकल्प अहवाल बनवुन घ्या. तुम्ही दिलेला निधी गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी वापरला जातो. आमच्या सेवेचा जास्तीत जास्त लाभ घ्या. |
माझीशेतीच्या शेळी पालन ग्रुपमध्ये सहभागी व्हा. |
उपजिविका विकास अंतर्गत 'शेळी पालन' लाभ दिलेले लाभार्थी शेलीसह... |
उपजिविका विकास अंतर्गत 'शेळी पालन' लाभ दिलेले लाभार्थी शेलीसह... |