Thursday, November 27, 2014

बहुचर्चित उस उत्पादक शेतकरी श्री. दत्ताञय पाटील, अंजनी यांच्या ऊस क्षेञास माझीशेतीची सदिच्छा भेट

माझीशेती शेतकरी प्रतिष्ठान (२७.११.२०१४):

बहुचर्चित उस उत्पादक शेतकरी श्री. दत्ताञय पाटील, अंजनी यांच्या ऊस क्षेञास माझीशेतीची सदिच्छा भेट

मागील बरेच दिवसांपासुन चर्चेत असणार्या श्री. दत्ताञय पाटील यांच्या ऊस क्षेञास भेट देण्याचा योग आज आला. मागील आठवड्यातील संस्थेच्या ‘महाराष्ट्र दौर्याचे’ वेळी २ ते ३ ठिकाणी संबंधीत ऊस आणि बियाण्यांबद्दल चर्चा झाली. त्यामुळे आम्ही भेटीचे नियोजन केले होते.
    श्री. दत्ताञय पाटील यांनी शेतकर्यांना एकाच ठिकाणी सर्व उत्तम प्रतीच्या बियाण्यांची उपलब्धता केलेली आहे. त्यामध्ये सिध्दगीरी १२३४,
नीरा-८६०३२,
कोईमतुर-०३१०२,
कोईमतुर -९८०५,
आधार
अश्या निरोगी ऊस बियाण्यांचे उत्पादन व संगोपन सुरु केले आहे. माझीशेती शिष्टमंडळातील सदस्य अंजनी, ता.तासगांव (सांगली) येथे पोहचुन ऊस पाहेपर्यंत बरेच शिष्टमंडळातील सदस्य नकारार्थी होते कारण मुळात अंजनी, ता.तासगांव (सांगली) हे ठिकाण ‘सेमी क्रिटीकल’ झोनमध्ये येत असल्यामुळे या दुष्काळी भागात उत्पादित केलेला ऊस कसा असेल या विषयावर आमची चर्चा चालुच होती पण वास्तवात जेंव्हा ऊस क्षेञ पाहिले तेंव्हा सदरच्या ऊस बियाण्यांचे उत्पादन व संगोपन चांगल्या पद्धतीने केले गेले आहे हे जाणवले... 
     आम्हास जाणविले
* ऊस पडलेला नव्हता.
* उंची सरासरी सुमारे १५ फुटांपर्यंत होती.
* सरळ व सशक्त वाढ झालेली दिसली.
* पानांवर कुस नव्हती.
* फुटवे १३ ते १४ होते.
* तुरा दिसुन आला नाही.
* व्यवस्थापन संपूर्ण सेंद्रिय पद्धतीने केले आहे.
* ऊसाचे साधारण वजन ४ ते ५ किलो आहे.
      श्री. दत्ताञय पाटील, अंजनी, ता.तासगांव (सांगली) यांनी सुरु केलेली शेतकरी सेवा ही वाखाणन्याजोगी आहे. त्यांच्याशी चर्चा करताना ते म्हणाले की ऊसाची उंची जास्त असली तरी ऊस सशक्त असल्यामुळे पडत नाही, विक्रमी उंची व वजन, सरळ व जोमदार वाढ, पानावर कुस नाही, त्यामुळे जनावरांच्या चार्रयासाठी उपयुक्त,शतप्रतिशत जर्रमिनेशन, गुळासाठी उत्तम, फुटवे १० ते १५, लवकर तुरा(झेंडा) येत नाही, यापैकी काही पाण्याचा ताण सहण करणार्या नविन जाती, १००% संपूर्ण शेंद्रिय व्यवस्थापन, १२ ते १३ महीन्यात पाणी लांबवीले की रिकवरी १२/१४ लागते, पुर्ण वाढलेला एक ऊस ४ ते ४.५ किलो भरतो. यातील काही जाती आपल्या भागात नवीन असलेने रोपवाटीकावाले जादा दर आकारून शेतकर्यांना लुबाडत आहेत.
      या ऊसाच्या संगोपनाबद्दल सांगताना श्री.दत्ताञय पाटील म्हणाले, शेतीला उन्हाळ्यात पाणी कमी असलेने कोणत्याही रासायनीक खताचा वापर न करता पूर्ण पणे शेंद्रीय नियोजन केले असून पाणी कमतरतेमुळे 26 जानेवारीला लागवड केलेला ऊस 26 जुनला मोठी बांधनी केलेचे सांगीतले. परंतू ,"ऊसाची लागण ही 5 बाय 2.5 फुटावर दोन कांडी (डोळे) आणि दीड महीण्यात बाळबांधणी व साडे तीन महीण्यात मोठी बांधनी व्हायलाच हवी आणि ऊस हे जास्त कालावधीचे पीक असलेने खतांचा वापर एकवेळच भरमसाठ न करता तीन वेळेस विभागून केलेस व त्याबरोबरच सुक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर करावयास हवा," असे नमुद केले.

~~~~
माझीशेती शेतकरी प्रतिष्ठान
६४७, दसरा चौक, सावळज जि.सांगली ४१६३११ (महा.)
वेबसाईट - www.mazisheti.org
फेसबुक - www.facebook.com/agriindia
ईमेल - mazishetifoundation@gmail.com
whats app - 9975740444

No comments:

Post a Comment