Thursday, April 26, 2018

कोल्हापूर : कसबा बावडा येथे बचत गटांच्या महिलांना उद्योगामध्ये रेकोर्ड किपिंगचे प्रशिक्षण, येणाऱ्या काळात बचत गट संकल्पनेला फाटा देऊन व्यवसाय गट निर्मितीवर भर देण्याचा महिलांचा निर्धार

कोल्हापूर : कसबा बावडा येथे बचत गटांच्या महिलांना उद्योगामध्ये रेकोर्ड किपिंगचे प्रशिक्षण देण्यात आले. या कार्यक्रमासाठी कोल्हापुर जिल्हा व महानगरपालिका यांचे शासकीय प्रतिनिधी उपस्थित होते. एक दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या स्वागताने झाली. माझीशेती शेतकरी प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. महेश बोरगे, अन्नपूर्णा सेवाभावी महिला संस्थेच्या अध्यक्षा डॉ. आश्लेशा चव्हाण मॅडम, श्री. प्रमोद गुरव सर, नरेंद्र जाधव आणि इतर मान्यवर यांच्या उपस्थितीत दीप प्रज्वलनाचा कार्यक्रम झाला. 

कार्यक्रमात मार्गदर्शन करताना श्री. प्रमोद गुरव सर यांनी महिलांसोबत संवाद साधला व महिला आपले घर सांभाळून कश्या पद्धतीने आणि कोण - कोण व्यवसाय करू शकतात याबद्दल मार्गदर्शन केले. उद्योग व्यवसायात उभ्या राहणाऱ्या महिलांच्या प्रश्नांना सविस्तर उत्तरे देऊन महिलांच्या शंकेचे निरसन केले. बचत गटातील कागदपत्रे आणि व्यवसायातील कागदपत्रे यातील फरक समजावून सांगताना माझीशेतीच्या मार्केट लिंकेज"प्रकल्पाबाबत माहिती देऊन सहभागी होण्यासाठी आवाहन केले.

माझीशेती शेतकरी प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री.महेश बोरगे सर यांनी महिलांना महिला बचत गटासाठी रेकॉर्ड किपिंग चे महत्व पटवून दिले आणि रेकॉर्ड किपिंग कसे करावे याचे सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच श्री.महेश बोरगे सरांनी महिलांना व्यवसाय गट ही संकल्पना समजावून त्याचे फायदे सांगितले व इच्छुक महिलांकडून त्यांच्या आवडीच्या व्यवसायाची माहिती घेऊन त्यासाठी काय केले पाहिजे आणि कोणत्या सरकारी कार्यालयामध्ये जावे याची सविस्तर माहिती दिली. उपस्थित महिलांनी येणाऱ्या काळात बचत गट संकल्पनेला फाटा देऊन व्यवसाय गट निर्मितीवर भर देण्याचा निर्धार केला. 

कार्यक्रमाचे वृत्तांकन श्री. नरेंद्र जाधव यांनी केले.
कार्यक्रमाची क्षणचित्रे 

Thursday, April 19, 2018

ग्रामीण शाश्वत विकास प्रकल्पाची अक्षय तृतीयेला कोल्हापुरात मुहर्तमेढ

माझीशेती शेतकरी प्रतिष्ठानचा ग्रामीण शाश्वत विकास प्रकल्पातील "बेदाणा क्लस्टर विकास प्रकल्प"मधील व्यवसाय शृंखला प्रकल्प कोल्हापूरमध्ये सुरु करण्यात आला. याप्रसंगी माझीशेतीच्यावतीने कोल्हापूर जिल्हा कृषी व्यवस्थापक नरेंद्र जाधव यांनी ठरावावर स्वाक्षरी केली तर प्रकल्पाच्या सुरुवातीसाठी अन्नपुर्णा सेवाभावी महिला संस्थेच्या वतीने समाजसेविका डॉ. आश्लेषा चव्हाण यांनी करारावर स्वाक्षरी केली. यावेळी शिल्पा पाटील, जयश्री पाटोळे, सुजाता साळोखे, फरीदा शेख व इतर व्यवसाय गटांच्या प्रतिनिधी महिला उपस्थित होत्या. 


सांगली, नाशिक, सोलापुर, सातारा, अहमदनगर या द्राक्ष उत्पादक ग्रामीण भागातील शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबाचा सर्वांगीण विकासासाठी माझीशेती शेतकरी प्रतिष्ठानचा ग्रामीण शाश्वत विकास प्रकल्प कार्यरत आहे. अवकाळी पाऊस, बाजारपेठ चढ-उतार, व्यापारी मनमानी या सर्व अडचणींवर मार्ग काढण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्याच्या वतीने शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला शेतमाल विक्री करण्याची जबाबदारी अन्नपूर्णा संस्थेने उचलली आहे. 

बचत गट आणि स्वयंसहायता गट या कल्पनेला फाटा देऊन माझीशेती अध्यक्ष महेश बोरगे यांच्या व्यवसाय गट या संकल्पनेच्या विस्तृत मागणीला पाठींबा मिळत आहे. उत्पादन, मुल्यवर्धन, विक्री आणि सेवा या चतुःसूत्रीने शेतकरी, ग्रामीण आणि शहरी व्यावसायिक गट (बचत गट, स्वयंसहायता गट, सुशिक्षित बेरोजगार गट, विद्यार्थी गट) एकत्रित बांधले गेल्यामुळे शासनाच्या "शेतकरी ते ग्राहक थेट विक्री" योजनेला पाठबळ मिळत आहे. गुणवत्ता व्यवस्थापन करण्यासाठी अतिउच्च धोरण ठेवून "विषमुक्त अन्न सोसायटीमध्ये पोहोचवण्यासाठी माझीशेतीची यंत्रणा कार्यरत आहे. 

संपुर्ण प्रकल्पामध्ये कौशल्य विकास करण्यावर अधिकाधिक भर देण्यात आला आहे. तासगाव जि.सांगली येथून प्रायोगिक स्तरावर नोंदणी केलेल्या १००० शेतकऱ्यांना सेंद्रिय शेती उत्पादने करण्यासाठी प्रशिक्षित केले जाते. त्यांच्या उत्पादित शेतमालाचे वर्गीकरण, निवड, वेष्टन करण्यासाठी व्यवसाय गटांना व्यवसाय व्यवस्थापन आणि विक्री कौशल्य प्रशिक्षण दिले जाते. माझीशेतीच्या धोरणांना कोणत्याही परिस्थितीत तडजोड केली जात नाही त्यामुळे शहरी सोसायटीमधील कुटुंबांची ओढ दिवसेंदिवस वाढत आहे. 

कृषी, ग्रामीण विकास, नाबार्ड, महापालिका, नगरपालिका अश्या शासकीय संस्थाच्या सहाय्याने विक्री व्यवस्था सक्षम झाली आहे. सर्व शासकीय व निमशासकीय यंत्रणांनी रोजगार निर्मिती, आरोग्य, उपजीविका, कौशल्य विकास अश्या उपक्रम राबविण्यासाठी या प्रकल्पामध्ये सहकार्य करावे, असे आवाहन महेश बोरगे यांनी केले. 

Wednesday, April 4, 2018

माझीशेती शेतकरी प्रतिष्ठानचा बेदाणा क्लस्टर विकास उपक्रमातून ३५०० लाभार्थी सामाजिक, आर्थिक आणि शारीरिकदृष्ट्या सक्षम - श्री. संजय माळी, प्रकल्प व्यवस्थापक


बेदाणा क्लस्टर विकास उपक्रम पार्श्वभूमी : माझीशेती शेतकरी प्रतिष्ठान मार्फत ग्रामीण भागाच्या विकासाकरिता शेतकरीमहिला आणि तरुण यांच्या सर्वांगीण विकासासाठी ग्रामीण शाश्वत विकास प्रकल्प राबविला जातो. शेतकरी बांधवांना शेती पिक उत्पादन पद्धती मार्गदर्शनासोबत तयार झालेला शेतमाल विक्री करिता सहकार्य आणि मार्गदर्शन केले जाते. परिणामी गुणवत्तापूर्ण आणि पोषक आहार उत्पादनाचे अंतिम ध्येय गाठता येते. शेतकऱ्यांनी कष्टाने पिकवलेला फळे - भाजीपाला पूरक विक्री व्यवस्था नसल्याने कवडीमोल किमतीने विकला जातो. बाजारपेठेचे नियोजन नसल्यामुळे बाजारातील आवक वाढल्यास व्यापारी शेतमालास योग्य भाव देऊ शकत नाहीत. यासंपुर्ण एकमेकांना पूरक बाबींचा अभ्यास केल्यानंतर प्रायोगिक तत्वावर दोन वर्षे प्रकल्प चालविल्यानंतर माझीशेती संस्था प्रत्यक्षात कृषी विभाग, स्थानिक स्वराज्य संस्था, शासकीय कार्यालये, बँक (आर्थिक / वित्तीय संस्था), शेतकरी, ग्रामीण व शहरी बचत गट, सेवा पुरवठादार यांच्या सहकार्याने परिपुर्ण विक्री व्यवस्था ज्यामध्ये शेतकऱ्यांना हमीभाव तर देता येईलच पण ग्राहकांना पोषक आणि गुणवत्तापूर्ण उत्पादने पोहोच करणे सोपे जात आहे. ग्रामीण भागात रोजगार निर्मिती आणि उपजीविका विकास हा एक प्रमुख विषय पुर्ण होताना दिसत आहे. 


बेदाणा क्लस्टर विकास उपक्रमाची सुरुवात व्यवसाय व्यवस्थापन प्रशिक्षणाने : ग्रामीण भागात उपलब्ध मनुष्यबळाची आवश्यकता पाहुन व्यवसाय कसा सुरु करायचा आणि सुरु केलेला सुस्थितीत चालण्यासाठी कोणती काळजी घ्यावयाची याचे प्राधान्याने प्रशिक्षण दिले जाते. एकूण २ दिवस अभ्यासक्रम + १ प्रात्यक्षिक असे ०३ दिवसांमध्ये शेतकरी, तरुण आणि महिलांना माहिती तंत्रज्ञानाचा व्यवसायामध्ये वापर, नेतृत्वकला, संवादकला, उत्पादन - व्यापार - सेवा यामधील फरक आणि पद्धत, जमा - खर्च, मनुष्यबळ व्यवस्थापन, विमा संरक्षण, मूल्यवर्धन आणि विक्री व्यवस्थापन, सोबत शासकीय मदत आणि प्रोत्साहन योजना असे विषयांचे प्रशिक्षण दिले जाते. परिणामी सहभागी घटकांचे मनोबल वाढते आणि इच्छित साध्य करणे सोपे जाते.




बेदाणा क्लस्टर विकास उपक्रमामध्ये शेतकऱ्यांना मिळणार उत्पादन खर्चावर आधारित हमीभाव : 

माझीशेतीच्या तज्ञ प्रशिक्षकांच्या सहाय्याने प्रतिवर्षी किमान ५०० व कमाल १००० शेतकरी बांधवांना व्यावसायिक शेती व्यवस्थापन प्रशिक्षण दिले जाते. एकुण २ (अभ्यासक्रम) + १ (प्रात्यक्षिक) असे ०३ दिवसांमध्ये शेतकऱ्यांना माहिती तंत्रज्ञानाचा शेतीमध्ये वापर, सुक्ष्म अन्नद्रव्ये आणि खत व्यवस्थापन, एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन, शासकीय मदत आणि प्रोत्साहन योजना असे अतिशय मुलभुत शेती व्यवसायकरिता आवश्यक प्रशिक्षण दिले जाते. त्यामुळे शेतकऱ्यांना उत्पादन खर्च कमी करण्यासाठी मदत होते. शिवाय उत्पादन होण्यापुर्वीच शेतकऱ्यांच्या मालाचा दर ठरत असल्यामुळे शेतकरी वर्गातुन समाधान व्यक्त होत आहे. एकंदरीत प्रती शेतकरी एक एकर द्राक्षबाग गृहीत धरल्यास १००० एकर द्राक्षबाग आणि त्यापासुन सरासरी ०५ ते ०६ टन प्रती एकर बेदाणा उत्पादन गृहीत धरून शेतकऱ्यांना सरसकट उत्पादन खर्चावर आधारित हंगामी हमीभाव रु. १२० प्रति किलो दिला जातोय.


बेदाणा क्लस्टर विकास उपक्रमामध्ये बचत गटांना रोजगाराचा पर्याय : बचत गट चळवळ महाराष्ट्राला नवीन नाही. पश्चिम महाराष्ट्रातील बचत गट सर्व बाजुने सक्षम आहेत, अगदी आर्थिक साक्षरता आणि सक्षमता बाबतीतही इथले बचत गट कमी नाहीत. बेदाणा क्लस्टर विकास उपक्रमामध्ये बचत गट प्राधान्याने सहभागी करून घेतले जातात. बचत गटांना एकत्रित करून त्यांना बेदाणा प्रतवारी, वेष्टन, विक्री व्यवस्थापनाचे प्रशिक्षण दिले जाते. प्रशिक्षित झालेल्या बचत गटांना व्यवसाय वृद्धीसाठी तंत्रज्ञान सहकार्य घेणे, बेदाणा ग्राहक आणि उत्पादक शेतकरी नोंदणी करणे, प्रतवारी आणि वेष्टन करणे, बाजारपेठ शोधणे आणि विक्री करून वेळोवेळी अहवाल जतन करून ठेवण्यासाठी मार्गदर्शन केले जाते. या माध्यमातून बचत गटांना सरासरी रु. १,००,००,०००/- वार्षिक नफा किंवा रोजगार निर्मिती होते. 

बेदाणा क्लस्टर विकास उपक्रमामध्ये माझीशेतीची भुमिका : 
संस्थेचे वेगवेगळ्या भागातील तज्ञ कार्यरत मनुष्यबळ साधन सुविधा पुरवण्याचे काम करते. प्रशिक्षण देऊन लाभार्थी घटकांना सक्षम करणे हे माझीशेतीचे प्रथम प्राधान्याचे काम आहे. माझीशेती शेतकरी प्रतिष्ठानच्या 'ग्रामीण शाश्वत विकास प्रकल्प निधीतून प्रति लाभार्थी अंदाजित रु. ३६५ खर्च करून १००० शेतकरी, २५०० बचत गटाचे सदस्य असे एकूण ३५०० लाभार्थी सामाजिक, आर्थिक आणि शारीरिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी प्रति वर्ष रुपये १२,७७,५००/- लाख प्रमाणे निधी तरतुद केलेली आहे.

ग्रामीण शाश्वत विकास प्रकल्पच्या 'बेदाणा उत्पादक शेतकरी विकास उपक्रमामध्ये पदभरती जाहिरात (१८०४०३)

माझीशेती शेतकरी प्रतिष्ठानच्या ग्रामीण शाश्वत विकास प्रकल्पाच्या 'बेदाणा उत्पादक शेतकरी विकास उपक्रमामध्ये ०७ (सात) पदे भरणे आहेत. 

अ.नं.
पदाचे नाव
शैक्षणिक अर्हता
०१
तज्ञ प्रशिक्षक (पदसंख्या - ०१)
Agri + MSW
०२
समुपदेशक (पदसंख्या - ०६)
Com + MSW

१. शैक्षणिक पात्रता - नियमित शिक्षण घेतलेले उमेदवारांना प्राधान्य राहील. पदव्युत्तर शिक्षण बहिस्थ झालेले असेल तर चालेल मात्र शैक्षणिक कालावधीत संबंधित उमेदवार हा सामाजिक संस्थेमध्ये कार्यरत असावा. अनुभवी उमेदवारांना प्राधान्य राहील. 
२. वेतन - मुळ वेतन रु. ७००० प्रतिमाह सोबत मुळ वेतनाच्या १५% प्रवास भत्ता, ०३% फोनबिल, १०% निवास भत्ता, ०५% वैद्यकीय भत्ता (विमा काढण्यास प्राधान्य द्यावे.) अतिरिक्त देय राहील. टीप : शहरी (District Headquarter) आणि महानगरीय (Metro City) भागासाठी निवास भत्ता अनुक्रमे ५% आणि १०% वाढीव देय राहील. पहिल्या महिन्याचे वेतन सहाव्या महिन्याच्या वेतनासोबत अदा केले जाईल. दुसऱ्या महिन्याच्या अहवाल सादरीकरणनंतर उमेदवारांचे बँक खातेवर नियमित वेतन होईल.
३. वयमर्यादा - उमेदवाराचे वय किमान 25 वर्षे किंवा कमाल 35 वर्षे असावे. माझीशेतीच्या लाभार्थी गटातील उमेदवारांना वयाची अट लागू नाही. 
४. आरक्षण - महिला उमेदवारांना ३०% राखीव जागा आहेत. इतर सर्व प्रवर्गांना विशेष आरक्षण नाही. 
५. पदसंख्या - 
i) प्रशिक्षक पदासाठी तासगाव जि.सांगली मुख्यालयी ०१ जागा आहे. 
ii) समुपदेशक पदासाठी सांगली, कोल्हापुर, सातारा, पुणे, मुंबई आणि बेळगाव येथे प्रत्येकी ०१ असे ०६ जागा आहेत. 
iii) प्रकल्प कालावधीपर्यंत नेमणुका वैध राहतील, त्यानंतर गुणवत्तेनुसार कालावधी वाढ लागू होईल. 
६. अर्ज प्रक्रिया - माझीशेती शेतकरी प्रतिष्ठानच्या रोजगार निर्मिती उपक्रमातून आलेले अर्ज छाननी करून कर्मचारी नियुक्त केले जातील. अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.