Wednesday, January 13, 2016

अ‍ॅपल बोर

अ‍ॅपल बोर लागवड -
हवामान :
या बोराचे झाड फार काटक असते. ते सर्व प्रकारच्या हवामानात वाढत असले, तरी उष्ण व कोरडे हवामान अ‍ॅपल बोरासाठी पोषक ठरते. आर्द्र हवेत झाडाची वाढ व फलधारणा समाधानकारक होत नाही. कमाल तापमान ३७ ते ४८ अंश सेल्शिअस अथवा त्याहून जास्त आणि किमान तापमान ७ ते १३ अंश सेल्शिअस आणि १५ सें.मी. पासून २२५ सें.मी. पावसाच्या प्रदेशात ही झाडे चांगली वाढतात. तसेच झाडाच्या योग्य वाढीसाठी भरपूर सूर्यप्रकाशाची आवश्यकता असते. हिमतुषारांमुळे झाडाला सहसा नुकसान पोहोचत नाही. झाडाला कोणत्याही प्रकारची इजा झाली अथवा ते आगीत होरपळून निघाले, तरी ते जिवंत राहते व पुन्हा वाढू लागते.

जमीन :
अ‍ॅपल बोराचे झाड चांगली हवा खेळणाऱ्या वाळूमिश्रित गाळवट जमिनीत चांगले वाढते. तसेच जांभ्या दगडाच्या खडकाळ अथवा चांगल्या निचऱ्याच्या काळ्या जमिनीसह सर्व प्रकारच्या जमिनीतही वाढते. या झाडाचे सोटमूळ थोड्या अवधीत खोलवर जाते व जमिनीतील थोड्या प्रमाणातील ओल झाडाच्या वाढीसाठी पुरेशी होते.

कलम : 
जंगली प्रकारांच्या खुंटावर अ‍ॅपल बोराच्या झाडांचे डोळे भरुन बोरांची चांगल्या प्रकारांची अभिवृध्दी करण्यात येते. रोपवाटिकेत डोळे भरलेल्या कलमांचे सोटमूळ थोड्या अवधीत खोल जाते व स्थलांतर करताना त्याला इजा पोहोचण्याचा संभव असतो. यासाठी शेतातच जंगली प्रकारांची रोपे लावून त्यांवर डोळे भरणे पसंत करतात; परंतु विशेष प्रकारचे तंत्र वापरुन रोपवाटिकेत डोळे भरलेल्या कलमांचे स्थलांतर करण्यात कृषि विद्यापीठांनी यश मिळविले आहे.
पडीक जमिनीत अथवा शेताच्या बांधावर वाढणाऱ्या बोरीच्या झाडावर अ‍ॅपल बोराच्या झाडांचे डोळे बसविल्यास चांगल्या प्रतीची बोरे मिळू शकतात. यासाठी जानेवारी ते मार्च महिन्यात जमिनीपासून १ ते १.२५ मी. उंचीवरील खोडाचा भाग कापून टाकतात आणि फुटून आलेल्या फांद्यांपैकी एक जोमदार फांदी ठेवून त्यावर डोळा बसवितात व तो फुटून आल्यावर शेंड्याकडील भाग कापून टाकतात. डोळे भरल्यापासून एक वर्षाच्या आत फळे धरण्यास सुरुवात होते.

लागवड : 
साधारणत: जूनमध्ये या बोरांची लागवड करतात. दोन झाडे व ओळीतील अंतर ५ बाय ५ मीटर किंवा ६ बाय ६ मीटर ठेवावे. त्यासाठी रोपं विकत आणावीत किंवा स्वतः तयार करावीत. लागवडीसाठी दीड फूट खोलीचे खड्डे खणून त्यात एक टोपले शेणखत, २५० ग्रॅम नत्र, ५०० ग्रॅम स्फूरद आणि १०० ग्रॅम पालाश, अर्धा किलो लिंबोळी पेंड, १० ग्रॅम फॉरेट टाकावे. जंगली बोर लावून त्यावर अ‍ॅपल बोराचा कलम, डोळा भरला तरी चालतो.

खत व पाणी व्यवस्थापन :
ज्याप्रमाणे लागवड करताना खत मात्रा देणे आवश्यक असते त्याचप्रमाणे ती छाटणीनंतरही देणे आवश्यक असते. छाटणीनंतर प्रत्येक झाडाला ५० किलो शेणखत द्यावं. तसेच २५० ग्रॅम नत्र, २५० ग्रॅम स्फूरद आणि ५० ग्रॅम पालाश प्रती झाड प्रती वर्ष या प्रमाणे रासायनिक खते द्यावीत. यापैकी फक्त नत्र दोन हफ्त्यांतून विभागून द्यावं. माती-पाणी परिक्षण व झाडांच्या वयानुसार खतांची मात्रा बदलावी. गरजेनुसार सुक्ष्म अन्नद्रव्ये ठिबकाद्वारे किंवा फवारणी करून द्यावे. तसेच फुलफळ व फळगळ नियंत्रणासाठी संजीवकांचा वापर करावा.
अ‍ॅपल बोर कमी पाण्यातही उत्तम प्रकारे येत असले तरी प्रति झाडास रोज एक ते दीड लिटर पाणी द्यावे. जमिनीच्या मगदुराप्रमाणे पाणी देणे आवश्यक असते. पाणी बचतीसाठी ठिबक सिंचनाचा वापर करावा. काही भागात पाचटाचे अच्छादनही करतात.

छाटणी :
अ‍ॅपल बोराच्या झाडाला फुटून येणाऱ्या फांद्या लांब, किरकोळ आकारमानाच्या व वेड्यावाकड्या वाढणाऱ्या असतात. झाडे लहान असताना त्या फळांच्या भाराने मोडतात. फांद्यांचा बळकट सांगाडा तयार करण्यासाठी वाढीच्या पहिल्या ३-४ वर्षांच्या काळात सर्व लांबलचक व नको असलेल्या फांद्या छाटतात. त्यानंतर दरवर्षी झाडाची छाटणी करणे आवश्यक असते कारण फळे चालू वर्षाच्या फुटीवर नांच्या बगलेत धरतात. अॅपल बेर या जातीला वर्षातून दोन वेळा बहार येतो. या बोरीपासून पावसाळा आणि हिवाळ्यात उत्पादन मिळते. 
छाटणी केल्याने फळांची संख्या वाढते व त्यांची प्रतही सुधारते. फळे काढून घेतल्यावर खरड छाटणी आणि मोहोर येण्यापूर्वी हलकी छाटणी करतात. खरड छाटणी करताना 60 सें.मी.पर्यंत मुख्य खोड ठेवून छाटणी करावी.

कीड-रोग व्यवस्थापन :
या फळाला प्रामुख्याने फळमाशी व पाने खाणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव होतो. फळमाशीमुळे या पिकाचे सर्वांत जास्त नुकसान होते. फळाच्या सालीत माशी लांबट आकाराची अंडी घालते व त्यांतून बाहेर पडणाऱ्या अळ्या फळात शिरुन गर खातात. दमट हवामानात या फळमाशीचा फार उपद्रव होतो. अळीच्या बंदोबस्तासाठी प्रथमतः किडलेली फळे गोळा करून त्यांचा नाश करवा. उन्हाळ्यात झाडाखालील जमिनीची मशागत करून या माशीचे कोष उन्हाने मारावेत. तसेच, बागेत एकरी ४-५ कामगंध सापळे लावावेत. 

या बोरावर कवकामुळे (बुरशीसारख्या हरितद्रव्यरहित वनस्पतीमुळे) भुरी नावाचा रोग विशेषेकरून आढळून येतो. पाने व फळे गळतात व झाडावर राहिलेली फळे नीट पोसत नाहीत. या रोगाच्या नियंत्रणासाठी गंधकाची धुरळणी किंवा पाण्यात मिसळणाऱ्या गंधकाची २० ग्रॅम १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
बाग स्वच्छ् ठेवल्यास कीड-रोगांचे प्रमाण कमी राहते. फळांची काढणी करण्यापूर्वी कमीत कमी १५ दिवस रासायनिक औषधांची फवारणी थांबवितात.
तयार झालेल्या फळांचे पक्ष्यांपासून फार नुकसान होते. मासे पकडण्याच्या जाळ्यांनी झाड झाकल्यास हे नुकसान पुष्कळ कमी होते.

काढणी व उत्पन्न :
कलमी झाडांना लागवडीपासून २-३ वर्षांनी व बी लावून तयार केलेल्या झाडांना ४-५ वर्षांनंतर फळे धरण्यास सुरुवात होते. फलधारणेच्या काळात जमिनीत पुरेशी ओल नसल्यास फळे गळतात. कच्ची फळे झाडावरुन काढल्यास पुढे ती पिकत नाहीत. 
छाटणी केल्यानंतर आठ-नऊ महिन्यांत फळे येण्यास सुरु वात होते. पहिल्या वर्षी प्रत्येक झाडाला किमान ३० ते ५० किलो बोरांचे उत्पादन होते. दुसर्‍या वर्षी प्रत्येक झाडाला ८० ते १२० किलो बोरांचे उत्पादन होते. सर्वसाधारण देशी बोरापेक्षा या बोराचे वजन ६० ग्रॅम पासून २०० ग्रॅमपर्यंत भरते. या जातीचे एक झाड सुमारे २० वर्षे जगते. झाडे कायम हिरवीगार राहतात.

अ‍ॅपल बोरांना स्थानिक बाजारपेठेत १५ ते २५ रुपयांपर्यंत भाव मिळत आहे. मागील वर्षी दिल्ली बाजारपेठेत हा दर ३० ते ४० रुपये प्रति किलो इतका होता. उत्तर भारतात प्रकाराप्रमाणे फेब्रुवारीच्या मध्यापासून एप्रिल अखेरपर्यंत फळे काढणीचे काम चालू राहते. दक्षिण व मध्य भारतात नोव्हेंबरपासून फळे बाजारात येतात. उत्पादकांची संख्या जास्त असल्यास दूरच्या बाजारपेठेमध्ये माल नेणे शक्य होते.

उपयोग : 
फळातील खाद्य भागात ८१.६% जलांश, ०.८% प्रथिन, ०.३% वसा (स्निग्ध पदार्थ) व १७% कार्बोहायड्रेट (शर्करा) असतात. शिवाय क जीवनसत्त्व आणि खनिजेही असतात. आवळा व पेरु ही दोनच फळे क जीवनसत्वाच्या बाबतीत बोरापेक्षा श्रेष्ठ आहेत. तसेच बोरातील कॅल्शियम, फॉस्फरस आणि लोह यांचे प्रमाण सफरचंद व संत्रे या फळांपेक्षा जास्त असते. पोषणाच्या दृष्टीने सफरचंदापेक्षा बोर श्रेष्ठ आहे.
पक्व फळे खाण्यासाठी व औषधासाठी वापरतात. फळे ताजी, सुकी, साखरेत मुरविलेली, वाफविलेली व धुरावलेली अशा निरनिराळ्या स्वरुपात खाण्यात येतात. झाडांचा पाला जनावरांना (गाई, शेळ्या) खाऊ घालतात. लाखेचे किडे पोसण्यासाठी या झाडांचा वापर करतात. तसेच वाऱ्याला अडथळा करून इतर वनस्पतींना संरक्षण देण्यासाठी या झाडांची लागवड उपयुक्त ठरली आहे. बियांतील गर झोप लागण्यासाठी देतात. बियांतील तेलाचा कातडी कमावण्यासाठी उपयोग करतात. सालीचा काढा अतिसार व आमांश यांवर देतात. लाकूड कठीण, मजबूत व टिकाऊ असते आणि त्यापासून शेतीची अवजारे, गाड्यांची चाके व बंदुकीचे दस्ते करतात, तसेच त्यांपासून कोळसाही तयार करतात.

मागील चार-पाच वर्षापासून कधी अतिवृष्टी तर कधी कमी पावसाने महाराष्ट्रातील शेतकरी हवालदिल झालेला आहे. पावसाच्या अनिश्चिततेवर उपाय म्हणून शेतकऱ्यांनी नवीन पीक पद्धतीचा वापर करावा. परंपरागत पीक पद्धतीला फाटा देऊन पावसाची अनियमितता व वातावरणातील बदलाप्रमाणे नवीन पिके घ्यावे. विशेषतः तेलकट डाग रोगग्रस्त डाळिंबाच्या पट्ट्यातील शेतकऱ्यांना हे बोर चांगला पर्याय होऊ शकेल.

बोरापासून बनवा बनविलेले पदार्थ - जॅम, जेली, मुरांबा

⭕जॅम⭕
१) पिकलेली निरोगी फळे वाहत्या स्वच्छ पाण्यात धुऊन घ्यावीत. फळातील बी कॉर्क बोररच्या साहाय्याने काढून त्यांचे लहान लहान तुकडे करावेत. या तुकड्यांच्या वजनाएवढे पाणी टाकून शिजवून घ्यावे व तो लगदा थंड झालेवर एक मिलिमीटरचे छिद्रे असलेल्या चाळणीतून काढून घ्यावा.
२) एकजीव केलेल्या १ किलो गरामध्ये १ लिटर पाणी, ७५० ग्रॅम साखर व ८-१० ग्रॅम सायट्रिक आम्ल मिसळून ते मिश्रण शेगडीवर गरम करावे.
३) मिश्रणाचा ब्रिक्स ६५ ते ६८ अंश ब्रिक्स आला किंवा ते मिश्रण तुकड्यात पडू लागले म्हणजे जॅम तयार झाला असे समजावे.
४) तयार झालेला जॅम गरम असतानाच निर्जंतुक केलेल्या रुंद तोंडाच्या काचेच्या बाटल्यांमध्ये भरून, बाटल्या थंड झाल्यावर मेणाचा थर देऊन किंवा अॅल्युमिनियम फॉइल लावून, लेबल लावून, बाटल्या थंड आणि कोरड्या जागी साठवून ठेवाव्यात.

⭕चटणी⭕
१) चटणीसाठी किंचित पिवळसर रंगाची निरोगी बोरे निवडून त्यांचा किस करून घ्यावा. एक किलो बोराच्या किसापासून साधारणतः १.५०० ते १.७५० किलो चटणी तयार होते.
२) चटणी तयार करण्यासाठी घटक - बोराचा किस - १ किलो, मिरची पूड - २० ग्रॅम, कांदा बारीक वाटलेला - ६० ग्रॅम, मीठ - ५० ग्रॅम, लसूण बारीक वाटलेला - १५ ग्रॅम, वेलदोडे पावडर - १५ ग्रॅम, दालचिनी पावडर - १५ ग्रॅम, व्हिनेगार - १८० मिली.
३) बोराच्या किसामध्ये साखर आणि मीठ मिसळून ते मिश्रण गरम करण्यास ठेवावे व सर्व मसाल्याचे पदार्थ मलमलच्या कापडाच्या पुरचुंडीमध्ये बांधून मिश्रणात सोडावी. अधून-मधून ही पुरचुंडी थोडीशी पळीने दाबावी म्हणजे मसाल्याचा अर्क उतरण्यास मदत होईल. हे मिश्रण ६७-६९ अंश ब्रिक्स येईपर्यंत शिजवावे व त्यात व्हिनेगार टाकावे. मिश्रण पुन्हा गरम करावे. गरम असतानाच ही तयार झालेली चटणी रुंद तोंडाच्या निर्जंतुक केलेल्या काचेच्या बाटलीमध्ये भरावी. थंड झाल्यावर बाटल्या वर जॅममध्ये उल्लेख केल्याप्रमाणे बंद करून कोरड्या जागी साठवून ठेवाव्यात.

⭕जेली⭕
१) बोराच्या फळामध्ये चांगले पेक्टिन असल्याने त्यांच्या थोड्या कच्च्या फळापासून पेरूपेक्षा उत्तम प्रकारची जेली तयार करता येऊ शकते. ज्याप्रमाणे पेरूपासून किंवा कवठापासून जेली केली जाते, त्याप्रमाणे बोरापासून उत्कृष्ट प्रकारची जेली तयार करता येते. ही जेली फ्रुटब्रेडमध्ये व बेकरी पदार्थ तयार करताना वापर करता येतो.

⭕मुरंबा⭕
१) मुरंबा तयार करण्यासाठी जास्त पिकलेली फळे वापरू नयेत. चांगली फळे निवडून, धुऊन, बी काढून त्यांचे काप करावेत किंवा किसून घ्यावेत. तो किस ३ मिनिटे उकळत्या पाण्यात धरावा. नंतर त्यामध्ये १:१ या प्रमाणात साखर व ८-१० ग्रॅम सायट्रिक आम्ल टाकून नंतर योग्य तार धरेपर्यंत गरम करावे व २४ तास तसेच ठेवून द्यावा.
२) तयार मुरंबा निर्जंतुक केलेल्या बाटल्यांमध्ये भरून, बाटल्या हवाबंद कराव्यात व लेबल लावून कोरड्या जागी साठवून ठेवाव्यात.

⭕लोणचे⭕
- पिकलेल्या बोरांपासून उत्तम प्रकारचे लोणचे करता येते. लोणच्यासाठी वापरावयाचे तेल प्रथम उकळून थंड करावे. यासाठी पुढील घटक वापरावेत.
- बोराच्या फोडी - १.५ किलो, मीठ - २५० ग्रॅम, खाद्य तेल - २४० ग्रॅम, मेथी (मध्यम भरडलेली) - २.५ ग्रॅम, मोहरी (मध्यम भरडलेली) - १०० ग्रॅम, मिरची पूड - ५० ग्रॅम, हिंग - ५० ग्रॅम, हळद पावडर - २५ ग्रॅम, सोडियम बेन्झोएट - ०.१ ग्रॅम.
- प्रथम फळाचे तुकडे व मीठ सोडून बाकी सर्व पदार्थ तेलात परतून घ्यावेत. मसाला व फळांचे तुकडे एकत्र मिसळून पुन्हा दोन-तीन मिनिटे परतून घेऊन मीठ मिसळावे.
- तयार लोणचे निर्जंतूक केलेल्या काचेच्या बाटल्यामध्ये भरून, हवाबंद करून, झाकण लावून त्या थंड व कोरड्या जागी साठवून ठेवाव्यात.

⭕सुकविलेली बोरे⭕
- बोरापासून सुकविलेली बोरे/ सुका मेवा तयार करण्यासाठी निरोगी, पिकलेली फळे निवडून पाण्याने स्वच्छ धुऊन घ्यावीत.
- नंतर ती फळे फडक्यात बांधून उकळत्या पाण्यात ४-६ मिनिटे धरावीत व थंड झालेवर २ ग्रॅम प्रति किलो बोर या प्रमाणात गंधकाची धुरी २ तास देऊन वाळवणी यंत्रात ६०-६५ अंश सें. तापमानाला १८-२० तास वाळवावीत.
- पॉलिथीनच्या पिशवीत वाळवलेली बोरे पॅक करून, पिशव्या हवाबंद करून थंड आणि कोरड्या जागी साठवून ठेवाव्यात. ताज्या बोरांमध्ये असणारे अन्नघटक आपणास सुक्या बोरांमधून मिळू शकतात.
- सुकविलेल्या बोरांचे लहान-लहान तुकडे करून त्यांचा उपयोग बेकरी पदार्थ व इतर अन्न पदार्थांमध्ये करता येतो. तसेच सुकविलेली बोरे साखरेच्या पाकात २४ तास ठेवून नंतर त्याच पाकात १० मिनिटे शिजविली असता, त्यांचा खजूर म्हणून उपयोग करता येतो.

⭕बोराचा चिवडा⭕
- पिकलेल्या बोरापासून उत्तम प्रकारचा चिवडा तयार करता येतो. यासाठी प्रथम निरोगी चांगली फळे निवडून स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यावीत. नंतर किसणीच्या साहाय्याने त्यांचा किस करून घ्यावा व तो किस फडक्यात बांधून उकळत्या पाण्यात ३-४ मिनिटे धरावा.
- नंतर २ ग्रॅम गंधक प्रति किलो किस याप्रमाणे २ तास गंधकाची धुरी द्यावी. यामुळे चिवड्यास पिवळसर रंग प्राप्त होतो व साठवणीच्या काळात बुरशीची लागण होत नाही. नंतर तो किस ट्रेमध्ये पातळ पसरून ते ट्रे ५५ अंश सें. तापमानाला १२ तास वाळवणी यंत्रात ठेवावेत.
-पूर्ण वाळल्यानंतर तो किस पॉलिथीनच्या पिशवीमध्ये भरून पिशव्या हवाबंद करून थंड आणि कोरड्या जागी साठवून ठेवाव्यात. वापरतेवेळी तो किस तेलात तळून त्यामध्ये चवीनुसार मीठ, तिखट व इतर मसाले टाकून त्याचा अस्वाद घ्यावा. ही चिवडा उपवासालादेखील चालतो.

⭕पावडर⭕
- पावडर तयार करण्यासाठी वरीलप्रमाणे तयार केलेला बोराचा वाळविलेला कीस ग्राइंडरला लावून तयार करून घेऊन ती पावडर वस्त्रगाळ करावी.
- नंतर वजन करून ४०० गेजच्या पॉलिथीनच्या पिशवीमध्ये भरून, पिशव्या हवाबंद करून, लेबल लावून, थंड आणि कोरड्या जागी साठवून ठेवाव्यात. या पावडरचा उपयोग सरबत तयार करण्यासाठी होतो.

⭕हवाबंद डब्यात साठविलेली बोरे⭕
- यासाठी उमराण या जातीचे बोरे वापरावीत. चांगली निवडलेली बोरे पाण्याची धुऊन घेतल्यानंतर त्याच्यातील बी कॉर्करच्या साहाय्याने काढून टाकावे व ती फडक्यात बांधून उकळत्या पाण्यात ३-४ मिनिटे धरावीत. त्यामुळे ती मऊ पडतात व साठवणीच्या काळात त्यांचा रंग बदलत नाही.
- नंतर फळे डब्यामध्ये भरून त्यावर ०.५० टक्के सायट्रिक आम्ल टाकून त्यावर ४० टक्के साखरेचा पाक ओतावा. डब्याची १ सें.मी. जागा वरून मोकळी ठेवावी. नंतर डब्यावर झाकण ठेवून ते एक्झॉस्ट बॉक्समध्ये ठेवून त्यामधून हवा काढून टाकावी.
- नंतर डबे डबल सिमरच्या सहाय्याने हवाबंद करावेत व पुन्हा पाश्चरायझर्स करावेत. नंतर हे डबे थंड करून, लेबल लावून, थंड आणि कोरड्या जागी साठवून ठेवावेत.

डॉ. विष्णू गरंडे
प्राध्यापक उद्यानविद्या विभाग,
कृषी महाविद्यालय, कोल्हापूर.

पपई

पपई

नर व मादी झाडे स्वतंत्र असून त्यांवर पानांच्या बगलेतून लांब नर-पुष्पांचे घोस अथवा एकेकटी स्त्री-पुष्पे येतात. एकत्रलिंगी झाडे व द्विलिंगी फुले क्वचित आढळतात. फुले पिवळी असतात; नर-पुष्पांमध्ये पाच पाकळ्या खाली जुळून लांब नलिका बनते व वरचा भाग नसराळ्यासारखा दिसतो. त्यात आखूड तंतूंची दहा केसरदले व वंध्य किंजमंडल असते. स्त्री-पुष्पाच्या पाच मांसल पाकळ्या तळाशी जुळलेल्या परंतु वर सुट्या व बाहेरच्या बाजूस वळलेल्या दिसतात. त्यात वंध्य केसरदले आढळतात; किंजदले पाच, जुळलेली व किंजपुट ऊर्ध्वस्थ असून त्यावर पंख्यासारखा पाच भागांचा किंजल्क असतो.

हवामान
कोरड्या उष्ण हवामानात आणि योग्य पाणीपुरवठा असेल अशा ठिकाणी पपईची वाढ चांगली होते. २° से. च्या खालील तापमान पपईला मानवत नाही. थंड हवामानात तयार झालेली फळे बेचव असतात.

जमीन
पपईच्या लागवडीला मोकळी, पाण्याचा निचरा चांगला होणारी तसेच जैव पदार्थांचा भरपूर पुरवठा असलेली जमीन चांगली असते. गाळाच्या जमिनीत त्याचप्रमाणे भारताच्या दक्षिणेकडील भागातील मध्यम काळ्या जमिनीत पपई चांगली वाढते. खडकाळ चुनखडीच्या व जैव पदार्थांचा अभाव असलेल्या तसेच भारी काळ्या व खोलगट जमिनीत परईची वाढ चांगली होत नाही. या पिकाच्या बाबतीत पाण्याच्या निचऱ्याला फार महत्त्व आहे. पाण्याचा निचरा योग्य प्रकारे न झाल्यास रोगामुळे खोड बुंध्याशी कुजते.

लागवड
रोपे लावून लागवड करतात. नांगरणी, भरखत घालणे, कुळवणी वगैरे मशागत केलेल्या जमिनीत कमी पावसाच्या प्रदेशात पावसाळ्याच्या सुरुवातीला व जास्त पावसाच्या प्रदेशात पावसाळ्याच्या अखेरीला रोपे लावतात.

रोपे तयार करणे
चांगल्या जातिवंत पुष्कळ फळे देणाऱ्या झाडाच्या पूर्ण पिकलेल्या फळांचे बी घेऊन ते धुवून स्वच्छ करून व सावलीत वाळवून साठवून ठेवतात. रोपे करण्याकरिता ताजे बी नेहमी चांगले असते. लागवडीच्या वेळेच्या आधी सु. दोन महिने रोपांसाठी बी पेरतात. एक हेक्टर क्षेत्रात लागवड करण्यासाठी रोपे तयार करावयाला २५० ग्रॅ. बी पुरेसे होते. बी सामान्यतः गादी वाफ्यांत लावतात. रोपे ९ - १२ सेंमी. उंचीची झाल्यावर ती वाफ्यांतून काढून तयार केलेल्या जमिनीत कायम जागी लावतात. दोन खड्‌ड्यांमध्ये २-३ मी. हमचौरस अंतर ठेवून रोपे लावतात. रोपाच्या अवस्थेत नर आणि मादी असा भेद ओळखता येत नाही. त्यामुळे लावलेल्या रोपांमधून ४०-६० टेक्केच मादीची झाडे निघतात. बाकीची नरझाडे असतात. नरझाडाला फळे येत नाहीत म्हणून ठराविक क्षेत्रातील उत्पन्न कमी येते. हे टाळण्याकरिता एकेका आळ्यात (खड्ड्यात) दोन-तीन रोपे लावतात. रोपे वाढून त्यांना फुले आली म्हणजे नर आणि मादी असा भेद ओळखता येतो. तेव्हा सबंध बागेत दोन-चार नराची झाडे ठेवून बाकीची नराची झाडे तोडून टाकतात. त्यामुळे त्या लागवडीत कमीतकमी निग्म्यापेक्षा अधिक मादी झाडे मिळतात.

पपई लागवड पध्दती 
लागवड पध्दती पिक संरक्षण
पपई पिकाची लागवड हि जुन-जुलै, फेब्रुवारी – मार्च, तसेच ऑक्टोबर – नोव्हेंबर
महिन्यात केली जाते.

पपई ची लागवड खालील प्रमाणे दोन ओळींत व दोन रोपांत अंतर ठेवुन करतात.
(table format)
। दोन रोपांतील अंतर (फुट) । दोन ओळीतील अंतर (फुट) । रोपांची संख्या प्रती हेक्टर ।  रोपांची संख्या प्रती एकर ।
6 6 3086 1235 
5 5 4444 1778
4 4 6944 2778

पपई ची लागवड करण्यापुर्वी ६० घन सें.मी. चे खड्डे करुन त्यात २ भाग शेणखत, १ भाग गाळाची माती, १ किलो गांडुळ खत, ५०० ग्रॅम निंबोळी पेंड, १०० ग्रॅम एम-४५, १०० ग्रॅम लिंडेन एकत्र करुन मिश्रण बनवुन भरावे.
पपई च्या रोपांस पाणी देतांना त्याच्या खोडास पाणी लागणार नाही याची काळजी घ्यावी.

पपई खत व्यवस्थापन
Days after Cultivation Fertilizer Qty per Acre ( kg ) N P K Remark

10th Day
Urea 0 0 0 0 Avoid Use as per as possible
DAP 50 9 23 0 For Branching and Root
Development
MOP 50 0 0 29 Soil Reserve for future Use is
Must

15th Day
Trichoderma
veride 200g 0 0 0 Protects from Soil born
diseases
19-19-19 25 4.75 4.75 4.75 5 times @5kg per week for 5
weeks
PSB 1kg 0 0 0 Long time effect for nutrition
uptek
Azotobacter v. 500ml 0 0 0 Natural Nitrogen supply
Humic Acid 2.5lit 0 0 0 Root Development

55th Day
12-61-00 25 3 15.25 0 5 times @5kg per week for 5
weeks
00-00-50 10 0 0 5 5 times @2kg per week for 5
weeks
Calcium Nitrate 10kg 0 0 0 Covers Leaf Curl Problem and
tip growth
MgSO4 10kg 0 0 0 Greenness and More
Photosynthesis
EDTA-Zn 250g 0 0 0 For Branching and shoot
Development
EDTA- Fe 250g 0 0 0 For Increased photosythesis
Boron 20% 250g 0 0 0 For Flowering

70th Day
Bacillus Subtilis 200g 0 0 0 Protects and Cures Soil born
diseases
Humic Acid 2.5lit 0 0 0 Root Development

90th Day
12-61-00 25 3 15.25 0 5 times @5kg per week for 5
weeks
00-00-50 25 0 0 12.5 5 times @5kg per week for 5
weeks
PSB 1kg 0 0 0 Flowering, prevents dropping
EDTA-Zn 250g 0 0 0 For Branching and shoot
Development
EDTA- Fe 250g 0 0 0 For Increased photosythesis
Boron 20% 250g 0 0 0 For Flowering
MgSO4 10kg 0 0 0 For Greenness and more
photosynthesis

125th Day
Urea 0 0 0 0 Avoid Use as per as possible
DAP 25 4.5 11.5 0 For Branching and Root
Development
MOP 50 0 0 29 Soil Reserve for future Use is
Must
19-19-19 25 4.75 4.75 4.75 5 times @5kg per week for 5
weeks
PSB 1kg 0 0 0 Long time effect for nutrition
uptake
Azotobacter spp. 500ml 0 0 0 Natural Nitrogen supply
Humic Acid 2.5lit 0 0 0 Root Development

160th Day
12-61-00 25 3 15.25 0 5 times @5kg per week for 5
weeks
00-00-50 25 0 0 12.5 5 times @2kg per week for 5
weeks
Calcium Nitrate 15 1.8 0 0 Covers Leaf Curl Problem and
tip growth
EDTA-Zn 250g 0 0 0 For Branching and shoot
Development
EDTA- Fe 250g 0 0 0 For Increased photosynthesis
Boron 20% 250g 0 0 0 For Flowering
MgSO4 10kg 0 0 0 For Greenness and more
photosynthesis

170th Day
KSB 1kg 0 0 0 For Potash Uptake
Humic Acid 2.5lit 0 0 0 For Root Development

195th Day
13-00-45 25 3.25 0 11.25 Balanced NPK Supply
12-61-00 25 3 15.25 0 Balanced NPK Supply
Mix Micrinutrients 2.5lit 0 0 0 Balanced Micronutrients
KSB 1kg 0 0 0 More Potash uptake
Humic Acid 2.5lit 0 0 0 Root Development

230th Day
13-00-45 25 3.25 0 11.25 5 times @5kg per week for 5
weeks
00-00-50 25 0 0 12.5 5 times @2kg per week for 5
weeks
KSB 1kg 0 0 0 More Potash uptake
Total 43.3 105 132.5

पपई पिकांस विविध संस्था २५० ग्रॅम नत्र, स्फुरद व पालाशची शिफारस करतात. यापैकी २५० ग्रॅम नत्राचा पुरवठा जर पपई पिकांस रासायनिक खतांद्वारे केला तर पपई
पिकावर मावा किडीचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात होवुन पपई पिकावर विविध व्हायरस ची लागण मोठ्या प्रमाणात होवुन त्याच्या परिणामी उत्पादन घटण्याचीच जास्त शक्यता असते. त्यामुळे पपई पिकांस रासायनिक स्वरुपातुन नत्राचा पुरवठा मुळीच करु नये. त्याऐवजी नत्र स्थिर करणारे जीवाणु, शेणखत यांचा वापर करावा. पपई लागवडीनंतर नियमितपणे पिकावर रसशोषण करणा-या किडींच्या नियंत्रणासाठी फवारण्या घेत राहव्यात. पपई पिकांस सुरवातीचे ४ ते ५ महिने काळातील रसशोषण करणा-या किडींच्या फवारण्यांमुळे जर किड मुक्त ठेवण्यात यश मिळाले तर पपई पिकावरिल व्हायरस रोगांवर नियंत्रण मिळवणे फार सोपे होते.

रसशोषण करणा-या किडींच्या नियंत्रणासाठी खालिल प्रमाणे किटक नाशकांचा वापर करावा.
(Table format)
लागवडीनंतर दिवस । किटकनाशक व्यापारी नाव । प्रमाण प्रती लि .
१० ते १२ दिवस इमिडाक्लोप्रिड कॉन्फिडार, सुपरमिडा ०.५ मिली
१८ ते २० दिवस डायमेथोएट रोगार २ मिली १०००० पीपीएम निम २ मिली
२५ ते २८ दिवस असिटामॅप्रिड प्राईड ०.५ ग्रॅम मोनोक्रोटोफॉस मोनोसिल २ मिली
३५ ते ३८ दिवस इमिडाक्लोप्रिड कॉन्फिडार, सुपरमिडा ०.५ मिली क्लोरोपायरीफॉस + सायपरमेथ्रिन हमला १ ते १.५ मिली
४० ते ४५ दिवस डायमेथोएट रोगार २ मिली असिटामॅप्रिड प्राईड ०.५ ग्रॅम १००००
पीपीएम निम २ मिली
६० ते ७० दिवस असिटामॅप्रिड प्राईड ०.५ ग्रॅम मोनोक्रोटोफॉस मोनोसिल २ मिली
११० ते १२० दिवस लॅम्डॅसाह्यलोथ्रिन कराटे १ मिली थायमेथॉक्झाम अक्टरा ०.२५ ग्रॅम
१५० ते १६० दिवस इमिडाक्लोप्रिड कॉन्फिडार, सुपरमिडा ०.५ मिली क्लोरोपायरीफॉस + सायपरमेथ्रिन हमला १ ते १.५ मिली

पपईवरील रोग नियंत्रण
पपईवर कोळी, मावा, तुडतुडा, पांढरी माशी, काळी आळी या किडींचा आणि रोपमर, मूळ कुजव्या, करपा, भुरी यांचा प्रादुर्भाव होतो. उत्तम प्रतीचे बियाणे, उत्कृष्ट मशागत, बागेचे सातत्याने निरीक्षण व प्रतिबंधात्मक उपाय योजनांनी किडी रोगांवर मात करता येते. पपई रिंग स्पोट हा अतिशय घातक विषाणू जन्य रोग पपईला होत असून त्यावर उपाययोजनांचा शोध सुरु आहे. हा रोग पसरविणाऱ्या किडीचा नायनाट करणे हा त्यावरील उपाय आहे. त्याच प्रमाणे महाराष्ट्र व दक्षिण भारतात मोठ्या प्रमाणात त्रासदायक ठरलेल्या मावा या किडीवर एसरोफेगस पपया या किडीचा वापर करून जैविक नियंत्रण करता येवू शकतो असा शोध नुकताच लागला आहे. 

प्रा. महेश कुलकर्णी ९४२२६३३०३०
(लेखक कृषी विद्यापीठ दापोली, जि. रत्नागिरी 
येथे सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.)

अंजीर

अंजीर
जमीन 
अगदी हलक्‍या माळरानापासून मध्‍यम काळया व तांबडया जमिनीपर्यंत अंजीर लागवड शक्‍य आहे. भरपूर चुनखडी असलेल्‍या तांबूस काळया जमिनीत अंजीर उत्‍तम वाढते. चांगला निचरा असलेली एक मीटर पर्यंत खोल असलेली कसदार जमीन अंजीरासाठी उत्‍तम होय. मात्र या जमिनीत चुन्‍याचे प्रमाण असावे. खूप काळया मातीची जमिन या फळझाडाला अयोग्‍य असते.

लागवड
जाती 
पुणे अंजीर, दिनकर

अभिवृध्‍दी :
अंजिराची अभिवृध्‍दी फाटे कलमाने केली जाते. खात्रीच्‍या बागायतदाराच्‍या रोगमुक्‍त बागेतील जोमदार वाढीची झाडे निवडून नंतर त्‍यातून उत्‍महाराष्‍ट्रम व दर्जेदार फळे देणारी झाडे निवडावीत व अशा झाडावरील १.२५ सेमी जाडीच्‍या आठ ते बारा महिने फांदया कलमासाठी निवडतात. लावण्‍यासाठी फाटेकरताना फांदीच्‍या तळाचा भाग व शेंडयाकडील कोवळा भाग छाटून टाकावा व मधला भाग रोपे तयार करण्‍यासाठी वापरावा. फाटे कलम तीस ते चाळीस सेमी लांब असावेत. त्‍यावर किमान चार ते सहा फूगीर व निरोगी डोळे असावेत. कलमांचा तळाचा काप डाहेळयाच्‍या काही खाली घ्‍यावा. आणि वरचा काप डोळयाच्‍या वर अर्धा सेमी जागा सोडून घ्‍यावा. दोन्‍ही काप गोलाकार घ्‍यावेत. फाटे कलम गादी वाफयावर ३० × ३० सेमी वर किंवा दोन डोळे मातीत जातील अशी लावावीत. कलमे किंचीत तिरिपी करावीत. लावण्‍यापूर्वी कलमाच्‍या बुडांना आय.बी.जे. किंवा सिरेडिक्‍स यासारखे एखादे मूळ फोडणारे संजीवक लावले तर मुळया लवकर फूटतात.

लागवड : 
अंजिराच्या लागवडीसाठी निवडलेली जमीन उन्हाळ्यात तयार करावी. ६ x ६ मीटर अंतरावर ६० x ६० x ६० सेंमी आकाराचे खड्डे तयार करावेत. प्रत्येक खड्ड्यात १ किलो सुपर फॉस्फेट आणि २५० ग्रॅम कल्पतरू सेंद्रिय खत टाकून खड्डे १:२ या प्रमाणात शेणखत व पोयट्याची माती यांच्या मिश्रणाने पावसाळ्यापूर्वी भरावेत. लागवड जून - जुलै महिन्यात तयार कलमे लावून करावी. लागवडीनंतर ३ ते ४ दिवसांच्या अंतराने कलमांना पाणी द्यावे. कलमांना बांबुंचा आधार द्यावा. कलमांना जर्मिनेटर ५ मिली/लि. पाणी या प्रमाणे द्रावण तयार करून २५० मिली द्रावणाची आळवणी (ड्रेंचिंग) करावे. म्हणजे पांढऱ्या मुळीचा जारवा वाढून त्यांची कार्यक्षमता वाढते. त्यामुळे कलमांची वाढ लवकर जोमदार होते. 
अंजिराची लागवड जून - जुलै ते सप्टेंबर - ऑक्टोबर या महिन्यात करावी. लागवडीसाठी जमिनीच्या मगदुराप्रमाणे ६ x ६ किंवा ५ x ५ मीटर अंतर ठेवावे.

वळण आणि छाटणी : 
ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मागील वर्षीच्या फांद्यांची योग्य रितीने छाटणी करावी. छाटणी करताना फांदीचा जोर पाहून ती शेंड्याकडील भागाकडून छाटावी. झाडाची हलकी छाटणी केल्यास छाटणी केलेल्या भागाच्या खालच्या भागावर २ ते ३ डोळे फुटून नवीन वाढीवर भरपूर फळे लागतात. छाटणीनंतर अंजिराच्या झाडावर जर्मिनेटर ५० मिली + प्रिझम ५० मिलीची १० लि. पाण्यातून फवारणी केल्यास अधिक डोळे फुटून भरपूर फुटवे मिळतात.

फांद्यांना खाचा पाडणे (नॉचिंग) : 
अंजिराच्या फांदीवरील डोळ्याच्या वर २.५ सेंमी लांब आणि १ सेंमी. रुंद तिरकस काप घेऊन खाचा पाडतात. फांदीवर खाच पाडताना साल आणि अल्प प्रमाणात खोडाचा भाग काढला जातो. साधारणपणे ८ - ९ महिने वयाच्या फांदीवर जुलै महिन्यात खाचा पाडतात. त्यामुळे फांदीवरील सुप्त डोळे जागृत होऊन नवीन फुटव्यांची संख्या वाढते. एका फांदीवरील छाटलेल्या भागाखालील तीन - चार डोळे सोडून खाचा पाडाव्यात. 

खते :
एक वर्षाच्‍या झाडाला साधारणपणे १ घमेले शेणखत व १०० ते १५० ग्रॅम अमोनियम सल्‍फेट पुरेसे होते. दरवर्षी हे प्रमाण वाढवीत नेऊन 5 वर्षे वयाच्‍या झाडांना 50 ते 60 किलो शेण खत व १ किलो अमोनियम सल्फेट द्यावे. लहान झाडांना खते नेहमी पावसाळयाच्‍या सुरुवातीला घालावीत नंतर मात्र मोठया झाडांना खते विश्रांततीचा काळ संपताना म्‍हणजे सप्‍टेबर महीन्‍याच्‍या अखेरीस द्यावीत. ५ ते ६ वर्षे वयाच्‍या झाडास ६०० ग्रॅम नत्र २५० ग्रॅम स्‍फूरद व २५० ग्रॅम पालाश दिल्‍याने फळे चांगल्‍या प्रतीची मिळतात.

पाणी :
झाड फळावर आल्‍यावर ऑक्‍टोबर ते मे महिन्‍यात नियमित पाणी द्यावे. जूलै व ऑगस्‍ट हा काळ झाडाच्‍या विश्रांतीचा असतो. फळे लागून वाढत असताना पाण्‍यात हयगय होऊ देऊ नये.
कारण त्‍यामुळे फळांच्‍या आकारावर अनिष्‍ठ परिणाम होतो. फळे पिकू लागल्‍यावर मात्र पाणी अतिशय कमी म्‍हणून आळी नुसती ओली होतील एवढे द्यावे. कारण अधिक पाण्‍याने फळाची गोडी कमी होते. फळे तोडणे पूर्ण झाल्‍यावर झाडाचे पाणी बंद करावे.

बहार धरणे : 
अंजिराच्या झाडाला वर्षातून दोन वेळा पावसाळ्यात 'खट्टा' बहार आणि उन्हाळ्यात 'मीठा' बहार येतो. खट्टा बहाराची फळे जुलै - ऑगस्टमध्ये तयार होतात. परंतु ही फळे चांगल्या प्रतीची नसतात. मीठा बहाराची फळे मार्च - एप्रिलमध्ये तयार होतात. या फळांचा दर्जा व उत्पादन चांगले असल्यामुळे प्रामुख्याने मीठा बहार घेतला जातो. मीठा बहार घेण्यासाठी सप्टेंबर महिन्यामध्ये हलकी मशागत करून पाणी न देत झाडांना ताण द्यावा. नंतर छाटणी करून खताची मात्रा द्यावी. वाफे बांधून बागेस पाणी देणे सुरू करावे. यामुळे झाडे सुप्तावस्थेतून बाहेर पडून ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यानच्या काळात झाडावर नवीन फुटीसह फळे येतात.

किडी  व रोग व्यवस्थापन :
अंजिरावर तुडतुडे, खवले कीड, कोळी. पिठ्याकीड, साल व बुंधा पोखरणारी अळी, पाने खाणारी अळी, मावा, फळे पोखरणारी अळी, इ. किडिंचा प्रादुर्भाव दिसून येतो.
खोडकिड्याच्या नियंत्रणासाठी छिद्रातील आळ्यांचा नाश करून डायक्लोरोफॉस प्रति लीटर 25 मिली मिसळून इंजेक्शनद्वारे सोडावे आणि छिद्र चिखलाने बंद करावे. 

तर तांबेरा रोग आढळतो. नियंत्रणासाठी क्लोरोथालोनिल 2 ग्रॅम + कारबेंडिज़म 1 ग्रॅम प्रति लीटर पाण्यात 10 दिवसाचे अंतराने 8 वेळा फवारावे. वाळलेली पाने जाळून नष्ट करावित.

मोसंबी

जमीन :
चोपण, क्षारपड जमिनीवर मोसंबीची लागवड टाळावी. मोसंबीसाठी मध्यम जमीन एक मीटर खोल काळी माती व त्याखाली नरम मुरूम असलेली जमीन लागवडीसाठी चांगली असते. जास्त चोपण, पाण्याचा निचरा न होणारी, जमिनीतील मुक्त चुनखडीचे प्रमाण दहा टक्‍क्‍यांपेक्षा जास्त असलेली जमिनीत लागवड करू नये. लागवडीसाठी न्यूसेलर, काटोल गोल्ड, फुले मोसंबी या जातींची निवड करावी. 

लागवड:
मोसंबीची लागवड 6 × 6 मीटरवर करावी. लागवडीसाठी 1 x 1 x 1 मीटर आकाराचे खड्डे घ्यावेत. खड्डे खोदताना खड्ड्यातील वरील चांगली माती वेगळी टाकावी. खड्डे उन्हाळ्यात 15 ते 20 दिवस चांगले तापवून द्यावेत. खड्डे खोदताना, भरताना तळाशी शिफारशीत कीडनाशक, पालापाचोळा किंवा वाळलेला काडीकचरा यांच्या मिश्रणाचा 15 सें.मी. थर भरावा.
त्यानंतर खड्डा भरण्यासाठी दोन टोपली शेणखत, खड्ड्यातून काढलेल्या वरच्या मातीच्या मिश्रणाने खड्डा भरावा. पाऊस पडल्यानंतर कलमांची लागवड करावी. कलमाचा जोड जमिनीपासून 20 ते 25 सें.मी. उंचीवर राहील याची काळजी घ्यावी. कलमे खात्रीच्या रोपवाटिकेतूनच घ्यावी. रंगपूर लाइम खुंटावरील कलमांना प्राधान्य द्यावे. कलमांचा डोळा 22 ते 25 सें.मी.वर बांधलेला असावा.

संत्रा

संत्रा, मोसंबी व लिंबू बागेची देखभाल
  • पाऊस नसल्यास जमिनीची मशागत करावी. निंदणी करून दुहेरी रिंग पद्धतीने सिंचनासाठी आळे करावे. यामुळे झाडाच्या मुळांना हवा मिळण्यास मदत होते.
  • बागेच्या पाणी व्यवस्थापनासाठी ठिबक सिंचन करावे.
  • लिंबावरील खैऱ्या रोगाचा फैलाव पावसाळ्यात फार झपाट्याने होतो, त्यामुळे लिंबाच्या झाडावरील रोगग्रस्त फांद्या, पाने कापून, जाळून नष्ट कराव्यात. झाडावर 180 ग्रॅम कॉपर ऑक्‍सिक्‍लोराइड आणि सहा ग्रॅम स्ट्रेप्टोमायसीन प्रति 60 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. दुसरी फवारणी आवश्‍यकतेनुसार 30 दिवसांनी करावी.
  • या महिन्यात फळातील रस शोषणाऱ्या पतंगाचाही प्रादुर्भाव असते. प्रौढ पतंग सायंकाळी बाहेर पडतात. पिकणाऱ्या आणि पिकलेल्या फळाच्या सालीत बारीक छिद्र पाडतात. पतंगांना आकर्षित करून मारण्यासाठी 20 ग्रॅम मॅलॅथिऑन प्रति दोन लिटर पाण्यात मिसळावे. यामध्ये 200 ग्रॅम गूळ किंवा फळांचा रस मिसळून विषारी मिश्रण तयार करावे. हे मिश्रण प्लॅस्टिक ट्रेमध्ये ओतून यावर प्रकाश सापळा बागेत लावावा. गळालेली फळे नष्ट करावीत.
  • कोळी किडीचा प्रादुर्भाव दिसताक्षणीच 1.5 मि.लि. डायकोफॉल किंवा विद्राव्य गंधक तीन ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. आवश्‍यक भासल्यास दुसरी फवारणी 15 दिवसांच्या अंतराने करावी.
  • फळातील रस शोषणाऱ्या पतंगामुळे 60 ते 70 टक्के फळगळ होऊ शकते. या किडीच्या नियंत्रणासाठी कडुनिंबावर आधारित कीडनाशकाची तीन मि.लि. (300 पीपीएम तीव्रता) प्रति लिटर पाण्यात मिसळून तोडणीच्या 15 दिवस पूर्व झाडांवर फवारणी करावी.

करवंद

माहिती अद्ययावत करणे चालू आहे, कृपया काही काळाने भेट द्यावी.

आवळा

आवळा
जमीन 
आवळा लागवडीसाठी हलकी ते मध्यम जमीन निवडावी.

लागवड
लागवडीसाठी एप्रिल महिन्यात 7 x 7 मीटर अंतरावर 1 x 1 x 1 मीटर अंतराचे खड्डे करून 20 किलो शेणखत, एक किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि शिफारशीत कीडनाशक भुकटी आणि मातीच्या मिश्रणाने भरून घ्यावेत. चांगला पाऊस झाल्यावर कलमांची लागवड करावी. लागवड करताना एकाच जातीची कलमे न लावता दोन ते तीन जातींची निवड करावी. त्यामुळे फळधारणा वाढण्यास मदत होते. 
वाण / बियाणे 
लागवडीसाठी कृष्णा, कांचन, NA-7, NA-10, चकय्या, नीलम या जातींची निवड करावी.

खत व्यवस्थापन
पूर्ण वाढ झालेल्या प्रति झाडास प्रति वर्ष (पहिले 10 वर्षे) 
शेनखत - 40 ते 50 किलो 
नत्र - 500 ग्रॅम (दोन हप्त्यात विभागुन द्यावे.)
स्फुरद - 250 ग्रॅम
पालाश - 250 ग्रॅम

कीड व रोग नियंत्रण 
साल खानारी आळी, खोड कीडा, खवले कीड आणि अनार बटरफ्लाय या किडिंचा प्रादुर्भाव होतो. 
यासाठी 10 लीटर पाण्यात मिसळून फवारनी करावी. 
पहिली फवारनी प्रवाही मोनोक्रोटोफोस (36%) 15 मिली किंवा प्रवाही लम्ब्डा सायहॅलोथ्रिन (5%) 6 मिली फवारावे.
दुसऱ्या फवारनीसाठी प्रवाही प्रॉफेनोफोस (50%) 10 मिली फवारावे.
तीसरी फवारनीसाठी पाण्यात मिसलणारी कार्बरील पावडर (50%) 20 ग्रॅम किंवा प्रवाही लम्ब्डा सायहॅलोथ्रिन (5%) 6 मिली फवारावे.

तांबेरा (करपा) नियंत्रणासाठी 1%  बोर्डोमिश्रण किंवा 0.2% मेंकोजेब हे बुरशीनाशक फवारावे.
फांदीमर या रोगाच्या नियंत्रणासाठी प्रादुर्भाव झालेल्या फांद्या कापून टाकाव्यात आणि त्यावर बोर्डोपेस्ट लावावी.

सीताफळ

सीताफळ
जमीन
सीताफळ लागवडीसाठी मुरमाड जमिनीत चार x चार मीटर आणि मध्यम जमिनीत 5 x 5 मीटर अंतरावर 45 सें. मी. x 45 सें. मी. x 45 सें. मी. आकाराचे खड्डे खणून ते चांगली माती आणि एक घमेले शेणखत आणि एक किलो सिंगल सुपर फॉस्फेट या मिश्रणाने भरून ठेवावेत.

लागवड 
5X5 मिटर
वाण - 
लागवडीसाठी बाळानगर, अर्का सहान (संकरित), टी.पी.-7, दौलताबाद, धारूर-6 या जातींची निवड करावी. 

खत व्यवस्थापन
पूर्ण वाढ झालेल्या प्रति झाडास प्रति वर्ष  
शेनखत - 30 ते 40 किलो 
नत्र - 250 ग्रॅम (दोन हप्त्यात विभागुन द्यावे.)
स्फुरद - 125 ग्रॅम
पालाश - 125 ग्रॅम

कीड व रोग नियंत्रण -
पिठ्या ढेकुन आणि फळकुज नियंत्रणासाठी बोर्डो मिश्रण 1% + मोनोक्रोटोफोस 1.5 मिली प्रति लीटर पाण्यातुन फवारावे
पिठ्या ढेकुनाच्या जैविक नियंत्रणासाठी व्हर्सिटीलियम लेकानी (फुले बगीसाइड) 100 लीटर पाण्यात 400 ग्रॅम + दूध 1लीटर मिसळून संध्याकाळी फवारणी करा.

जांभुळ

माहिती अद्ययावत करणे चालू आहे, कृपया काही कालावधीनंतर भेट द्यावी.

लिंबू

लिंबू 

जमीन 
कागदी लिंबू पिकाला मध्यम काळी, हलकी मुरमाड, पाण्याचा उत्तम निचरा होणारी, जास्त चुनखडी व क्षार नसणारी जमीन निवडावी. साधारणपणे 6.5 ते 7.5 सामू व क्षारांचे प्रमाण 0.1 टक्‍क्‍यापेक्षा कमी असलेली जमीन कागदी लिंबू लागवडीस चांगली असते.

लागवड
हे बागायती बहुवर्षीय फळझाड असल्यामुळे हमखास पाणीपुरवठ्याची सोय असेल तेथेच लागवड करावी. लागवड 6 x 6 मीटर अंतरावर करावी. लागवडीसाठी 1 x 1 x 1 मीटर आकाराचे खड्डे उन्हाळ्यात खोदून उन्हात चांगले तापू द्यावेत. पावसाळ्यापूर्वी प्रत्येक खड्ड्यात दिड किलो सिंगल सुपर फॉस्फेट, पाच ते सहा घमेली चांगले कुजलेले शेणखत, निंबोळी पेंड व चांगल्या पोयटा मातीने खड्डे भरावेत. त्यानंतर जातिवंत रोपांची लागवड करून योग्य व्यवस्थापन करावे.

नर्सरी 
विक्रम, प्रमालिनी, साई सरबती, फुले शरबती

आंतरपीके
कांदा, लसूण, मूग, चवळी, हरभरा, घेवडा, भुईमूग, गहू, मोहरी