कायमचे प्रश्न

१. माझीशेती प्रतिष्ठान सोबत कामाचे स्वरूप कसे असेल ?
माझीशेती शेतकरी प्रतिष्ठान सोबत वेगवेगळ्या स्तरावर काम करून सामाजिक योगदान देता येते. गावस्तरावर कामाची सुरुवात करून जिल्हास्तरापर्यंत ३ टप्प्यावर सहभागी होऊन सामाजिक योगदान देता येते. 

२. माझीशेती शेतकरी प्रतिष्ठानसोबत काम करण्यासाठी प्राथमिक आवश्यकता कोणती आहे ?
अगदी नवीन ज्यांना कामाचा अजिबात अनुभव नाही अश्या व्यक्ती /संस्था देखील आमच्यासोबत काम करू शकतात. वैयक्तिक पातळीवर काम करण्यासाठी तीव्र इच्छाशक्ती आणि निर्णयक्षमता आवश्यक आहे. सहभागी होण्यासाठी इथे क्लिक करा.
संस्थाकरिता आवश्यकता : सहभागी होणाऱ्या संस्थेकडे स्वतःचे किमान ०२ तज्ञ मनुष्यबळ (०१ समाजकार्य व ०१ कृषि), किमान ०१ संगणक आणि इंटरनेट सुविधा सेट असणारे १० x १० चे स्वतःचे अथवा भाड्याने असणारे कार्यालय आवश्यक आहे. सहभागी होण्यासाठी इथे क्लिक करा.

२.१ या प्रकल्पात सहभागी होण्यासाठी काही रक्कम भरावी लागते का?
लाभार्थी हिस्सा : विकास प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी लाभार्थ्यांना (शेतकरी, महिला, विद्यार्थी) ₹ ०१ प्रतिदिन प्रमाणे ₹ ३६५ संस्थेच्या खातेवर जमा करणे आवश्यक आहे. सहभागी होण्यासाठी इथे क्लिक करा.
प्रक्रिया फी : नोकरी करिता अर्ज करणाऱ्या प्रत्येक अर्जदारास ₹५०० संस्थेच्या खातेवर जमा करणे आवश्यक आहे. सहभागी होण्यासाठी इथे क्लिक करा.
सुरक्षा ठेव निधी : संस्थांना सुरक्षा अनामत रक्कम रु. १०,०००/- (दहा हजार) संस्थेकडे जमा करणे अनिवार्य आहे. सहभागी होण्यासाठी इथे क्लिक करा.

३. माझीशेती प्रतिष्ठान सोबत काम करण्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत ?
संस्था करिता कागदपत्रे :
१. नोंदणी प्रमाणपत्र / आधार कार्ड
२.१ ऑनलाईन संकेतस्थळावर केलेल्या अर्जाची प्रत
२.२ माझीशेती सोबत काम करण्यासाठी इच्छुक असलेबाबत संस्थेचा / गटाचा ठराव
३. PAN कार्ड
४. बँक पासबुक किंवा रद्द केलेला धनादेश
५.१ क्लोजअप फोटो ०१ आणि उभे राहून फोटो ०१ 
५.२ संस्थेच्या आतील व बाहेरील दर्शक फोटो
६.१ अर्ज प्रक्रिया फी जमा केलेल्या निधीचे प्रमाण पत्र
६.२ सुरक्षा ठेवीकरिता जमा केलेल्या निधीचे प्रमाण प्रत
यासोबत आवश्यकतेनुसार आणि मागणीनुसार इतर आवश्यक कागदपत्रे पुर्तता करावी लागेल.

४. माझीशेतीने नेमुन दिलेल्या कार्यक्षेत्रात अंमलबजावणीला सुरुवात कशी करायची??
सहभागी होणाऱ्या संस्थांना करावयाची प्राथमिक कर्तव्ये आणि जबाबदारी :
१. ग्रामीण शाश्वत विकास प्रकल्प आणि संस्थेच्या सामाजिक कार्याची माहिती देणे आणि मासिक कार्यशाळा आयोजित करणे. (ठिकाण - अंगणवाडी, कॉलेज, ग्रामपंचायत, सोसायटी, बँक, शासकीय कार्यालये)
२. ग्रामीण शाश्वत विकास प्रकल्पमध्ये लाभार्थी (शेतकरी, विद्यार्थी, बेरोजगार तरुण, महिला, व्यावसायिक) नोंदणी करणे.
३. ग्रामीण शाश्वत विकास प्रकल्पाची मासिक मिटिंग घेणे व दस्तऐवज ठेवणे.
४. ग्रामीण शाश्वत विकास प्रकल्पाचे कार्यक्षेत्रातील कार्याचे साप्ताहिक, मासिक, त्रैमासिक अहवाल पाठवणे.

५. माझीशेतीने नेमुन दिलेल्या कार्यक्षेत्रात विकास कामे करण्यासाठी मनुष्यबळ लागते का ?
सहभागी होणाऱ्या संस्थेकडे स्वतःचे किमान ०२ तज्ञ मनुष्यबळ (०१ समाजकार्य व ०१ कृषि आवश्यक आहे. यांच्यासोबत इतर अधिक आवश्यक असणाऱ्या कामासाठी आवश्यक मनुष्यबळ निर्मिती विद्यार्थी विकास उपक्रमातून केली जाते. विद्यार्थ्यांना सहभागी करून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

) माझीशेती सोबत काम केल्यामुळे काही रक्कम / निधी / मानधन मिळते का ?
माझीशेतीच्या लाभार्थी घटकांकडून लोकवर्गणी जमा करणे, प्रकल्पाची वेगवेगळ्या प्रकारचे निधी जमा करणे तसेच समाजातील दात्या लोकांकडून लोकहिताच्या कामासाठी निधी संकलन करणे अश्या निधी संकलनासाठी होणारा व्यवस्थापन आणि इतर खर्चापोटी प्राप्त निधीस अनुसरून मागणीनुसार निधी दिला जातो. निधी मागणीसाठी इथे क्लिक करा.

७) माझीशेती सोबत केलेल्या कामाची रक्कम / निधी / मानधन केंव्हा आणि कसे मिळते ?
प्रत्येक महिन्याच्या ०५ तारखेपर्यंत मागील महिन्याचा अहवाल सादर केल्यानंतर संबंधित सहभागी घटकांना निधी बँक खातेवर दिला जातो. पहिल्या महिन्याचा निधी सहाव्या महिन्याच्या निधीसोबत दिला जातो. दुसऱ्या महिन्यापासून नियमितपणे प्रतीमाह निधी हस्तांतर केला जातो. माझीशेतीच्या व्यासपीठावर सहभागी झालेल्या प्रत्येक  संस्था / व्यक्ती / आस्थापना या घटकांना किमान १० % ते जास्तीत जास्त ६५% मानधन किंवा व्यवस्थापन खर्च मिळतो. निधी मागणीसाठी इथे क्लिक करा.

८) माझीशेतीची कामे माझ्या मित्रांना सांगितली तर मला काही मोबदला मिळणार का ?
सहभागी झालेल्या कोणत्याही घटकाने (शेतकरी, महिला, तरुण) यांनी माझीशेतीची माहिती इतरांना सांगितली आणि एखादा लाभार्थी (शेतकरी, महिला, तरुण) "ग्रामीण शाश्वत विकास" प्रकल्पामध्ये सहभागी झाल्यास माहिती सांगणाऱ्यांना १०% प्रचार-प्रसिद्धी करिता निधी दिला जातो. उदा. तुमच्या नोंदणी क्रमांकाचा आधार घेऊन शेतकरी, विद्यार्थी आणि महिला यांच्यापैकी कोणताही घटक "ग्रामीण शाश्वत विकास" प्रकल्पामध्ये सहभागी झाल्यास प्राप्त निधीच्या १०% नोंदणी क्रमांक धारकाच्या बँक खातेवर एकत्रितपणे महिनाखेरीस जमा केले जातात. निधी मागणीसाठी इथे क्लिक करा.

९) मला पुर्णवेळ माझीशेती सोबत काम करायचे झाल्यास वेगळी तरतूद आहे का?
माझीशेतीच्या सर्व सहयोगी व्यक्ती / संस्थाना व्यवसाय निर्मिती आणि वृद्धीसाठी स्वतंत्र तरतूद केलेली आहे. सहभागी होणाऱ्या व्यक्तींना किमान वेतन ३००० दिले जाते. सोबत प्रवास खर्च (१५%), फोन खर्च (३%), निवास खर्च (१०%), वैद्यकीय खर्च (०५%) (विमा काढणेस प्राधान्य द्यावे.) हा निधी प्रतिवर्ष १०% याप्रमाणे वाढत जातो. सहभागी होण्यासाठी इथे क्लिक करा.

१०) माझीशेती सोबत संस्था / गट / कंपनी यांना काम करायचे झाल्यास वेगळी तरतूद आहे का?
माझीशेतीसोबत नोंदणी झालेल्या संस्था / गट / कंपनी यांना कार्यालयीन खर्चासाठी प्रतिमाह ७००० इतका निधी दिला जातो. याशिवाय व्यवस्थापन केलेबद्दल रु. १ लाखपर्यंत २५%, १ लाख ते १० लाखपर्यंत ३५%, १० लाख ते ५० लाख पर्यंत ४५% आणि ५० लाख नंतर पुढे ६५% निधी दिला जातो.

११) सामाजिक काम करण्यासाठी क्षेत्र मर्यादा आहे का ?
प्रत्येक सहभागी होणाऱ्या घटकाला सुरुवातीला प्रकल्प स्तरावर काम करावे लागते. प्रत्येक प्रमुख बाजारपेठेचे गाव आणि त्याच्या परिसरातील छोटी गावे मिळुन एक प्रकल्प क्लस्टर तयार होतो. प्रत्येक टप्प्यावर मिळालेला लक्ष्यांक पुर्ण झालेनंतर वरील स्तरावर काम करण्याचे अधिकार दिले जातात.
अ.नं.
कार्यक्षेत्र
भौतिक लक्षांक
आर्थिक लक्षांक
०१
प्रकल्प स्तर
१,००० लाभार्थी
३,६५,०००
०२
तालुका स्तर
१०,००० लाभार्थी
३६,५०,०००
०३
जिल्हा स्तर
५०,००० लाभार्थी
३,६५,००,०००
०४
विभाग स्तर
१,००,००० लाभार्थी
३६,५०,००,०००

१२) माझीशेतीसोबत काम करताना इतर काही काम करता येते का ?
शेतकरी, महिला आणि तरुण यांच्या हिताच्या गोष्टी संस्थेच्या पुर्वपरवानगीने राबविता येतात.

No comments:

Post a Comment