Search here..

Showing posts with label agriculture. Show all posts
Showing posts with label agriculture. Show all posts

Monday, January 23, 2012

शेतीमधील संवाद क्रांतीचे जनक माझीशेती शेतकरी प्रतिष्ठान, सांगली - एक नजर


श्री.पांडुरंग मारुती मोरे, सावळज
'माझीशेतीच्या' माध्यमातून आधुनिक 
शेती करतात..
(सदर फोटो दर्शक आहेत)
जगातील पहिला प्रकल्प, कोणत्याही मोबदल्याशिवाय भारतीय शेतकर्यांना मोबाईल सेवेमार्फत मार्गदर्शन.... 2009 साली प्रायोगिक तत्वावर महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यात प्रारंभ केलेली ही सेवा सध्या प्रचंड प्रमाणात विस्तारली आहे. ही सेवा सर्व शेतकर्यांच्या मोबाईलवर चालु करता येते. यामध्ये शेतकर्यांच्या मोबाईल क्रमांक संदर्भात प्रचंड गोपनीयता बाळगली जाते. याशिवाय शेतकर्यांना त्यांचे मोबाईलवर मोफत स्थानिक हवामान, बाजारभाव, पीक सल्ला, शासकीय योजना देनेचीही सोय करनेत आली आहे. त्याकरिता शेतकर्यांना त्यांची माहिती माझीशेती शेतकरी प्रतिष्ठानच्या या लिंकवर कळवावी लागते. सन २००९ पासुन अविरतपणे ही सेवा चालु आहे. कोणत्याही प्रकारचे पाठबळ नसताना ग्रामीण भागातील तरुण महेश बोरगे (Mahesh Borge) यांनी केलेला प्रयोग आज संपुर्ण महाराष्ट्र आणि 5 राज्यात वेगवेगळ्या स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून कोणत्याही प्रचार -प्रसिद्धी शिवाय चालु आहे.

श्री. अंबिका महिला बचत गट, वज्रचौन्डे
यांचा  'माझीशेती'च्या माध्यमातून
कडधान्ये व्यवसाय ...
(सदर फोटो दर्शक आहेत)

शासकीय योजनांचा सुकाळ, शेतकर्यांची जात्याच संशोधक वृत्ती, वेगवेगली कृषि विद्यापीठाच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रियन शेतकरी आपल्या शेतातुन उत्पादन काढीत आहेत पण ब्रिटिश कालापासून व्यापारी अणि शेतकरी जनता यांचेत समन्वय नसल्यामुले आजही शेतकर्यांचे नुकसान होत आहे. या करिता माझीशेती शेतकरी प्रतिष्ठानच्या शेतकर्यांना त्यांच्या उत्पादित मालाला योग्य भाव आणि व्यापारी, करखानदारयांना चांगल्या प्रतिचे, उच्च दर्जाचे शेतमाल देण्याचा संस्थेचा प्रयत्न आहे. याशिवाय शेतकर्यांना वेगवेगळ्या बाजारपेठेतील अद्यावत माहिती उदा. आवक, प्रति क्विंटल दर इ. ही सेवा मोबाईलवर उपलब्ध करुन दिलेली आहे. 



कृषितद्न्य श्री. शंकरराव निंबालकर
यांचे बागेतिल भाजीपाला...
(सदर फोटो दर्शक आहेत)
  
जागतिक बाजारपेठेत पाश्चात्य देशांनी पिकवलेल्या भाजीपाल्याला जास्त मागणी आहे. भारतातील आणि पाश्चात्य देशातील उत्पादनात काहीही फरक नाही. जो फरक आहे तो उत्पादनासाठी अमलात आनल्या जाणार्या पद्धतिमध्ये. भारतीय शेतिला सेवा पुरवठा करणारे बाहेरच्या देशातुन सेंद्रिय खते, औषधे मागवतात आणि त्यामध्ये पूर्वापर चालत आलेल्या सवयींनुसार प्रमाण वाढवुन आकर्षक आवरण वापरून बाजारात विक्रिला पाठवतात, यामध्ये नुकसान फक्त शेतकर्यांचे होते. यावर उपाय म्हणजे शेतकर्यांनी एकत्र येवून शेतीला ज्या आवश्यक गोष्टी आहेत त्या पडतालुन खात्री करुन मगच वापराव्यात. तसेच बाहेरच्या देशातुन काही जैविके मागवायाची झाल्यास स्वत:  मागवावित. याही बाबतीत माझीशेती शेतकरी प्रतिष्ठानच्या माध्यमातून शेतकर्यांना मदत मार्गदर्शन केले जाते. एकंदरित सर्व शेतकर्यांनी त्यांची वार्षिक मागणीनुसार आणि गरजेनुसार सर्व एकत्र खरेदी करुन त्याचे वाटप केले जाते. यामध्ये मोठ्याप्रमाणात खरेदी झालेमुले बरीच बचत होते आणि शेतकर्यांचा फायदा होतो.

शेतकरी संघटन आणि स्वयंसेवी संस्था यांच्या सहकार्याने गेले पाच वर्षांत संस्था महाराष्ट्र राज्यातील तळागाळात पोहचुन भारतीय कृषि व्यवस्थापन क्षेञामध्ये खारीचा वाटा उचलत आहे यात शंका नाही.